01.03.2026: डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे महाराष्ट्र लोकभवन येथे स्वच्छता अभियान
01.03.2026: ज्येष्ठ निरुपणकार डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर घेण्यात आलेल्या स्वच्छता अभियाना अंतर्गत महाराष्ट्राच्या राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या महाराष्ट्र लोकभवन येथे श्री सदस्यांतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. राज्यपालांचे सहसचिव एस राममूर्ती, भाप्रसे यांच्या हस्ते लोकभवन प्रवेश द्वाराजवळ अभियानाचे उदघाटन झाले. स्वच्छता अभियानात जवळपास दोनशे श्री सदस्यांनी भाग घेतला व लोकभवनातील समुद्र किनारा व इतर परिसरातून ४१६ किलो प्लास्टिक - थर्माकोल कचरा गोळा केला.
01.03.2026:On the occasion of the birth anniversary of senior spiritual orator Dr. Nanasaheb Dharmadhikari, a statewide cleanliness drive was organized. As part of this initiative, members of the Pratishthan carried out a cleanliness campaign at Maharashtra Lok Bhavan, the official residence of the Governor of Maharashtra. The drive was inaugurated near the entrance gate of Lok Bhavan by S. Ramamurthy, IAS, Additional Secretary to the Governor. Nearly 200 Shri members participated in today’s cleanliness drive and collected 416 kilograms of plastic and thermocol waste from the seashore and other areas within the Lok Bhavan premises.