01.02.2024: राज्यपालांनी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण: आव्हाने, उपाययोजना व पुढील मार्ग’ या विषयावरील चर्चासत्राला संबोधित केले
01.02.2024: राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या विमेन इनोव्हेशन स्टार्टअप आंत्रप्रेन्युअरशिप (WISE) इन्क्युबेशन सेंटरचे उदघाटन जुहू कॅम्पस येथे संपन्न झाले. यावेळी राज्यपालांनी 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण: आव्हाने, उपाययोजना व पुढील मार्ग' या विषयावरील चर्चासत्राला संबोधित केले. चर्चासत्राचे आयोजन एसएनडीटी महिला विद्यापीठ, संस्कृती, शिक्षा उत्थान न्यास व भारतीय शिक्षण मंडळ यांनी केले होते. यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ उज्वला चक्रदेव,उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, राष्ट्रीय संगठन मंत्री, भारतीय शिक्षण मंडळ बी. शंकरानंद, शिक्षा व संस्कृती उत्थान न्यासाचे राष्ट्रीय सचिव अतुल कोठारी, शोभा पैठणकर, विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
01.02.2024: Governor Ramesh Bais inaugurated the Women Innovation Startup Entrepreneurship (WISE) Incubation Center of Smt. Nathibai Damodar Thackersey Women's University at the University's Juhu Campus in Mumbai. The Governor addressed a seminar on 'National Education Policy: Challenges, Remedies and the Way Forward'. The seminar was organized by SNDT Women's University, Sanskriti, Shiksha Utthan Nyas and the Bharatiya Shikshan Mandal. Prof Dr. Ujwala Chakradev, Vice Chancellor of the University, Vikas Chandra Rastogi, Principal Secretary, Higher and Technical Education, B. Shankaranand, Rashtriya Sangathan Mantri, Bharatiya Shikshan Mandal, Atul Kothari, Secretary, Sanskriti Shiksha Utthan Nyasa, Deans, Heads of Department, members of faculty and students were present.