१८.०३ .२०२३: झेवियर इन्स्टिट्युशन ऑफ इंजनिअरिंगचा दीक्षांत समारोह राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न
18.03.2023 : झेवियर इन्स्टिट्युशन ऑफ इंजनिअरिंग या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा १४ वा वार्षिक दीक्षांत समारोह राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या माहीम येथील परिसरात संपन्न झाला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते महाविद्यालयाच्या वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले, तसेच तीन विद्याशाखांमधील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सेंट जोसेफ विद्यापीठ, बंगळूरुचे कुलगुरू डॉ व्हिक्टर लोबो, मद्रास विद्यापीठाचे माजी कुलगुरू इग्नासिमुथू, झेवियर इन्स्टिट्युशन ऑफ इंजनिअरिंगचे संचालक डॉ जॉन रोस, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वाय. डी. वेंकटेश, गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य, संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, स्नातक विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
18.03.2023: Governor Ramesh Bais presided over the 14th Annual convocation of the Xavier Institution of Engineering at Mahim in Mumbai. The Governor launched the Annual College Magazine and felicitated the toppers from three Engineering disciplines. Dr. Victor Lobo, Vice Chancellor of St. Joseph's University, Bangalore, Dr Ignacimuthu, former Vice Chancellor of Madras University, Dr John Rose, Director, Xavier Institution of Engineering, Dr Y D Venkatesh, Principal, members of the Governing body, Principals of affiliated colleges, teachers, staff, graduating students and parents were present.