२७.०१.२०२०: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज नागपुर येथे लोकमत टाईम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्डस 2020 प्रदान करण्यात आले. विदर्भाच्या वैद्यकीय सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल विविध वैद्यकीय विशेषज्ञांना राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात आले. ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. के. एच संचेती, लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, डॉ. संजीव जुनेजा, डॉ. अविनाश भोंडवे यांसह पुरस्कार निवड मंडळाचे प्रमुख डॉ. एस. एन. देशमुख, डॉ. राजीव खंडेलवाल आदी यावेळी उपस्थित होते.