परिचय
महाराष्ट्राचे राज्यपाल हे महाराष्ट्र राज्याचे संविधानिक प्रमुख असून ते भारतीय संविधानानुसार विनिर्दिष्ट केलेल्या अधिकारांचा वापर करतात. राज्यातील विद्यापीठांचे राज्यपाल हे पदसिध्द कुलपती आहेत. विविध क्षेत्रांच्या विकासाच्या दृष्टीने संविधानाच्या अनुच्छेद 371 (2) अन्वये राज्यपालांना विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे. तसेच संविधानाच्या अनूसूची पाच अन्वये राज्यपालांना अनुसूचित क्षेत्रांच्या प्रशासनाबाबत देखील विशेष जबाबदारी आहे.
राज्यपाल सचिव कार्यालय हे राज्यपालांना त्यांची संविधानिक, औपचारिक आणि इतर जबाबदारी तसेच विद्यापीठांचे कुलपती या नात्याने जबाबदारी पार पाडण्यासाठी सहाय्य करतात.
राज्यपाल सचिव हे राज्यपाल सचिव कार्यालयाचे प्रमूख असून त्यांना विविध अधिकारी आणि कर्मचारी वर्ग त्यांच्या पदाची जबाबदारी पार पाडण्यासाठी मदत करतात. त्याबाबतचा तपशील लोकभवन संकेतस्थळावरील “संघटन” या शिर्षाखाली देण्यात आलेला आहे. राज्यपाल सचिव कार्यालयामध्ये राज्यपाल सचिवालय आणि परिवार प्रबंधक कार्यालय या दोन कार्यालयांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात राज्यपालांची चार निवासस्थाने आहेत, ज्यांना सामान्यतः “लोकभवन मुंबई”, “लोकभवन पुणे”, “लोकभवन नागपूर”, आणि “ लोकभवन महाबळेश्वर”, असे म्हणतात. राज्यपाल सचिवालयाचे मुख्य कार्यालय लोकभवन मुंबई येथे आहे.
राज्यपालांची निवासस्थाने खालील ठिकाणी स्थित आहेत:
- लोकभवन मुंबई, वाळकेश्वर रोड, मलबार हिल, मुंबई – ४०० ०३५.
- लोकभवन पुणे, गणेश खिंड – लोकभवन औंध रोड, पुणे – ४११ ००७.
- लोकभवन नागपूर, सदर, नागपूर – ४४० ००१.
- लोकभवन महाबळेश्वर, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा – ४१२ ८०६.