बंद

    राज्यपालांच्या हस्ते पुणे विधानभवन प्रांगणात मुख्य ध्वजारोहण

    प्रकाशित तारीख: August 15, 2018

    भारतीय स्वातंत्र्याचा 71 वा वर्धापनदिन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्साहात पार पडला. पुणे विधानभवनाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या समवेत त्यांचे सचिव बी.वेणू गोपाल रेड्डी होते.

    यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, खासदार अमर साबळे, आमदार निलम गोऱ्हे, मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, शरद रणपीसे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम ,पुणे पोलीस आयुक्त व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे नूतन पोलीस आयुक्त पद्मनाभन, पोलीस अधीक्षक संदीप पाटील,कृषी आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पुणे महानगर पालिका आयुक्त सौरभ राव, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हार्डीकर, नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे, पीएमआरडीएचे किरण गित्ते, भूजल संरक्षण व विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड, जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, निवृत्त अधिकारी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

    ध्वजारोहणानंतर राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर त्यांनी ध्वजारोहण समारंभाला उपस्थित असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेऊन स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. याशिवाय अन्य मान्यवर व अधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.