राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची संवेदना अपंग पुनर्वसन केंद्रास भेट
महाराष्ट्र शासन
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई
जिल्हा माहिती कार्यालय, लातूर
मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळ मजला, उत्तर बाजूस लातूर-413512
वृत्त क्र.626
दिनांक 16 ऑक्टोबर 2018
राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची
संवेदना अपंग पुनर्वसन केंद्रास भेट
दिव्यांग मुलांना राज्यपाल यांच्या हस्ते विशेष साहित्याचे वाटप
लातूर,दि.१६- येथील हरंगुळ (बु) येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत संचलित संवेदना अपंग पुनर्वसन केंद्रास राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी भेट दिली. यावेळी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, खासदार सुनील गायकवाड, जनकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ.रवींद्र साताळकर,प्रकल्प अध्यक्ष ॲड.जगन्नाथ चितोडे,सचिव सुरेश पाटील हे उपस्थित होते.
जनकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर यांनी राज्यपाल चे.विद्यासागर राव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राज्यपाल यांनी काही दिव्यांग विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच संस्थेच्या उपक्रमांची माहितीही घेतली. त्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात नम्रता धिरज सोनवणे व मयुरी मनोज पाटील या दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष साहित्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी हरंगुळ ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष शेळके, हरंगुळ (बु) चे सरपंच सूर्यकांत सुडे, संवेदना अपंग पुर्नवसन प्रकल्पाचे समिती सदस्य भूषण दाते, रत्नदीप बोटवे, सौ.सपना सारडा, डॉ. प्रदीप कुमार शहा,अजित नागावकर ,योगेश निटूरकर,जयप्रकाश रेड्डी तसेच संवेदना अपंग पुनर्वसन केंद्राचे सर्व शिक्षक, कर्मचारी वर्ग,पालक उपस्थित होते.