08.08.2026: राज्यपालांनी श्री गुरू तेग बहादूर जी यांचा वारसा या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन केले
08.08.2026: श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५० व्या हौतात्म्य दिनाचे औचित्य साधून आयोजित ‘श्री गुरू तेग बहादूर जी यांचा वारसा’ या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथील पंजाब हेरिटेज भवन येथे संपन्न झाले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय, साहित्य अकादमी नवी दिल्ली आणि पंजाबी कल्चरल अँड वेल्फेअर असोसिएशन, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचा व्हिडीओ संदेश दाखवण्यात आला. कार्यक्रमाला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, नवी मुंबई महानगर पालिकेच्या महापौर सुजाता पाटील, साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक, उपाध्यक्षा कुमुद शर्मा, हरियाणा साहित्य आणि सांस्कृतिक अकादमीचे अध्यक्ष कुलदीप चंद्र अग्निहोत्री, साहित्य अकादमीचे सचिव वरुण गुलाटी, , प्रशासक तख्तश्री अबचल नगर, हुजूर साहिब विजय सतबीर सिंह, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे तसेच साहित्यिक, विद्वान आणि शीख समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.