07.08.2026: राज्यपालांच्या हस्ते दिलीप संघवी यांना ‘आयएए बिझनेस लीडर ऑफ द इयर’ पुरस्कार प्रदान
Zoom 07.08.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते आज सन फार्मास्युटिकल्सचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक दिलीप संघवी यांना कॉर्पोरेट उत्कृष्टतेसाठीचा ‘आयएए बिझनेस लीडर ऑफ द इयर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. इंटरनॅशनल अॅडव्हर्टायझिंग असोसिएशन (आयएए) इंडिया चॅप्टरतर्फे आयोजित १३ व्या आयएए लीडरशिप अवॉर्ड्स सोहळ्यात राज्यपालांनी संघवी यांना सन्मानित केले.
यावेळी इंटरनॅशनल अॅडव्हर्टायझिंग असोसिएशन (आयएए) इंडिया चॅप्टरचे अध्यक्ष अभिषेक कर्नानी, पुरस्कार निवड मंडळाच्या अध्यक्षा तसेच कोलगेट-पामोलिव्ह इंडिया लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभा नरसिंहन, आयएए लीडरशिप अवॉर्ड्सच्या अध्यक्षा नंदिनी डायस, विविध उद्योग क्षेत्रांतील मान्यवर तसेच २०२६ सालच्या आयएए बिझनेस लीडर पुरस्कारांचे मानकरी उपस्थित होते.
07.08.2026: Maharashtra Governor Jishnu Dev Varma today presented the IAA Business Leader of the Year Award for Corporate Excellence to the Founder and Managing Director of Sun Pharmaceuticals DIlip Shanghvi in Mumbai. The Governor honoured Shanghvi at the 13th IAA Leadership Awards function organised by the International Advertising Association (IAA) India Chapter. Abhishek Karnani, President of the International Advertising Association (IAA) India Chapter; Prabha Narasimhan, Jury Chair and MD & CEO, Colgate-Palmolive India Ltd., Nandini Dias, Chairperson, IAA Leadership Awards, captains of Industry and recipients of the IAA Business Leader Awards for 2026 were present.