बंद

    07.08.2026: सुषमा स्वराज या अष्टपैलू प्रतिभावंत राजकारणी : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    प्रकाशित तारीख : August 7, 2026
    07.08.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना आज ‘अग्निशिखा सुषमा स्वराज’ या हिंदी अनुवादित पुस्तकाची पहिली प्रत भेट देण्यात आली. डॉ. मेधा सोमय्या यांनी मूळ मराठीत लिहिलेल्या या पुस्तकाचा हिंदी अनुवाद अमरजीत मिश्र यांनी केला आहे. सुषमा स्वराज या अष्टपैलू प्रतिभावंत राजकारणी होत्या.  आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत भूषविलेल्या प्रत्येक पदावर त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला, असे उद्गार राज्यपालांनी याप्रसंगी काढले. सुषमा स्वराज या अमोघ वक्त्या होत्या; उत्कृष्ट संसदपटू होत्या; लढवैय्या विरोधी पक्ष नेत्या होत्या व कार्यक्षम मंत्री होत्या. आज समाजाला त्यांच्या सारख्या समकालीन आदर्शवत व्यक्तिमत्वाची (रोल मॉडेलची) गरज आहे असे राज्यपालांनी सांगितले. स्वराज यांनी केलेले संस्कृत मधील एक भाषण इतके अस्खलित आणि विद्वत्ता प्रचुर होते की संस्कृतच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी ते ऐकावे. आपण विद्यापीठांना सुषमा स्वराज यांचे ते भाषण ऐकण्याची शिफारस करु असेही त्यांनी सांगितले.  उत्तर पूर्वेकडील राज्यात आपले पक्ष संघटन कमजोर होते. सुषमाजी मात्र कार्यकर्त्यांच्या निमंत्रणावरून आवर्जून उत्तर पूर्वेकडील राज्यांना भेट द्यायच्या. भाषणाला जाण्यापूर्वी त्या स्थानिक भाषेतील शब्द, वाक्य समजून घ्यायच्या व भाषणात वापरायच्या. त्यामुळे त्या उत्तर पूर्वेत अतिशय लोकप्रिय होत्या असे राज्यपालांनी सांगितले.  यावेळी लेखिका डॉ मेधा सोमैया व अनुवादक अमरजीत मिश्र यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  यावेळी माजी केंद्रीय मंत्री डॉ किरीट सोमय्या, नगरसेवक डॉ नील सोमय्या, मुंबईचे माजी उपमहापौर अरुण देव तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

    सुषमा स्वराज या अष्टपैलू प्रतिभावंत राजकारणी : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    अमरजीत मिश्र यांच्या ‘अग्निशिखा सुषमा स्वराज’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

    महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना आज ‘अग्निशिखा सुषमा स्वराज’ या हिंदी अनुवादित पुस्तकाची पहिली प्रत भेट देण्यात आली. डॉ. मेधा सोमय्या यांनी मूळ मराठीत लिहिलेल्या या पुस्तकाचा हिंदी अनुवाद अमरजीत मिश्र यांनी केला आहे.

    सुषमा स्वराज या अष्टपैलू प्रतिभावंत राजकारणी होत्या. आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत भूषविलेल्या प्रत्येक पदावर त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला, असे उद्गार राज्यपालांनी याप्रसंगी काढले.

    सुषमा स्वराज या अमोघ वक्त्या होत्या; उत्कृष्ट संसदपटू होत्या; लढवैय्या विरोधी पक्ष नेत्या होत्या व कार्यक्षम मंत्री होत्या. आज समाजाला त्यांच्या सारख्या समकालीन आदर्शवत व्यक्तिमत्वाची (रोल मॉडेलची) गरज आहे असे राज्यपालांनी सांगितले.

    स्वराज यांनी केलेले संस्कृत मधील एक भाषण इतके अस्खलित आणि विद्वत्ता प्रचुर होते की संस्कृतच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी ते ऐकावे. आपण विद्यापीठांना सुषमा स्वराज यांचे ते भाषण ऐकण्याची शिफारस करु असेही त्यांनी सांगितले.

    उत्तर पूर्वेकडील राज्यात आपले पक्ष संघटन कमजोर होते. सुषमाजी मात्र कार्यकर्त्यांच्या निमंत्रणावरून आवर्जून उत्तर पूर्वेकडील राज्यांना भेट द्यायच्या. भाषणाला जाण्यापूर्वी त्या स्थानिक भाषेतील शब्द, वाक्य समजून घ्यायच्या व भाषणात वापरायच्या. त्यामुळे त्या उत्तर पूर्वेत अतिशय लोकप्रिय होत्या असे राज्यपालांनी सांगितले.

    यावेळी लेखिका डॉ मेधा सोमैया व अनुवादक अमरजीत मिश्र यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

    यावेळी माजी केंद्रीय मंत्री डॉ किरीट सोमय्या, नगरसेवक डॉ नील सोमय्या, मुंबईचे माजी उपमहापौर अरुण देव तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

    *****

    सुषमा स्वराज बहुआयामी प्रतिभा की धनी राजनीतिज्ञ थीं : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    अमरजीत मिश्र द्वारा अनूदित ‘अग्निशिखा सुषमा स्वराज’ पुस्तक का लोकार्पण

    महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा को आज ‘अग्निशिखा सुषमा स्वराज’ के हिंदी अनुवाद की प्रथम प्रति भेंट की गई। डॉ. मेधा सोमैया द्वारा मूल रूप से मराठी में लिखित इस पुस्तक का हिंदी अनुवाद अमरजीत मिश्र ने किया है।

    इस अवसर पर राज्यपाल ने कहा कि भूतपूर्व केंद्रीय मंत्री दिवंगत सुषमा स्वराज बहुआयामी प्रतिभा की धनी राजनीतिज्ञ थीं। उन्होंने अपने लंबे सार्वजनिक जीवन में जिस-जिस पद की जिम्मेदारी संभाली, प्रत्येक पद पर अपनी कार्यकुशलता और विशिष्ट पहचान की अमिट छाप छोड़ी।

    राज्यपाल ने कहा कि सुषमा स्वराज एक ओजस्वी वक्ता, उत्कृष्ट संसदीय व्यक्तित्व, संघर्षशील विपक्ष की नेता तथा अत्यंत कुशल मंत्री थीं। आज समाज को उनके जैसी समकालीन आदर्श व्यक्तित्व की आवश्यकता है।

    उन्होंने कहा कि सुषमा स्वराज का संस्कृत में दिया गया एक भाषण इतना धाराप्रवाह और विद्वत्तापूर्ण है कि संस्कृत के प्रत्येक विद्यार्थी को उसे अवश्य सुनना चाहिए। उन्होंने कहा कि वे विश्वविद्यालयों को सुषमा स्वराज का वह भाषण सुनने की अनुशंसा करेंगे।

    राज्यपाल ने कहा कि उस समय उत्तर-पूर्व के राज्यों में पार्टी का संगठन अपेक्षाकृत कमजोर था, फिर भी सुषमा स्वराज कार्यकर्ताओं के निमंत्रण पर वहां अवश्य जाती थीं। किसी भी सभा को संबोधित करने से पहले वे स्थानीय भाषा के शब्द और वाक्य सीखती थीं तथा अपने भाषण में उनका प्रयोग करती थीं। इसी कारण वे उत्तर-पूर्व के राज्यों में अत्यंत लोकप्रिय थीं।

    इस अवसर पर लेखिका डॉ. मेधा सोमैया तथा अनुवादक अमरजीत मिश्र ने भी अपने विचार व्यक्त किए।

    कार्यक्रम में पूर्व केंद्रीय मंत्री डॉ. किरीट सोमैया, नगरसेवक डॉ. नील सोमैया, मुंबई के पूर्व उपमहापौर अरुण देव तथा विभिन्न क्षेत्रों के अनेक गणमान्य व्यक्ति उपस्थित थे।