05.08.2026: राज्यपालांच्या हस्ते लडाख येथील युवा धर्मगुरू पल्गा रिम्पोछे, इंद्रेश कुमार राष्ट्रीय एकात्मिक समरसता पुरस्काराने सन्मानित
राज्यपालांच्या हस्ते लडाख येथील युवा धर्मगुरू पल्गा रिम्पोछे, इंद्रेश कुमार राष्ट्रीय एकात्मिक समरसता पुरस्काराने सन्मानित
महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लडाख येथील महायान बुद्ध परंपरेतील ८ वे अवतारी लामा पल्गा रिम्पोछे तसेच ज्येष्ठ विचारवंत इंद्रेश कुमार यांना यांना शांतता व राष्ट्रीय एकात्मतेसाठी केलेल्या कार्याबद्दल मुंबई येथे ‘राष्ट्रीय एकात्मिक समरसता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला विविध धर्मांचे प्रतिनिधी आणि बौद्ध भिक्षु संघाचे भिक्षु तसेच निमंत्रित उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते भिक्षूंना प्रातिनिधिक रूपात चीवरदान करण्यात आले.
**