01.08.2026: विद्यापीठात माननीय राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण
01.08.2026
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर
जनसंपर्क विभाग
………………………………………………………..
विद्यापीठात माननीय राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण
-हरित नागपूर घडविण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात करणार १००० वृक्ष लागवड
-केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते देखील वृक्षारोपण
नागपूर : (१-८-२०२६)
हरित नागपूर घडविण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती श्री. जिष्णू देव वर्मा यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. अंबाझरी मार्गावरील जमनालाल बजाज प्रशासकीय भवनाशेजारी असलेल्या खुल्या परिसरात शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात भारत सरकारचे माननीय सडक परिवहन व महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते देखील वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षारोपण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलपती श्री. जिष्णू देव वर्मा यांनी भूषविले, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भारत सरकारचे माननीय सडक परिवहन व महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्याचे माननीय शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, नागपूर महानगराच्या महापौर मा. श्रीमती नीता ठाकरे, आमदार श्री. मोहन मते, आमदार श्री. प्रवीण दटके, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे, मा. कुलपतींचे सचिव लोकभवन मुंबई डॉ. प्रशांत नारनवरे (आयएएस), कुलसचिव डॉ. विजय खंडाळ, उपमहापौर श्रीमती लीलाताई हाथीबेड, महापालिकेच्या स्थायी समिती सभापती शिवानी दाणी, महापालिका पक्षनेता श्री. बाल्याभाऊ बोरकर, भाजप शहर अध्यक्ष श्री दयाशंकर तिवारी, श्री. रितेशजी गावंडे, वित्त व लेखा अधिकारी श्री. हरीश पालीवाल यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या कार्यक्रमात मा. राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा, भारत सरकारचे मा. सडक परिवहन व महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्याचे माननीय शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, नागपूर महानगराच्या महापौर मा. श्रीमती नीता ठाकरे, प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे, मा. कुलपतींचे सचिव लोकभवन मुंबई डॉ. प्रशांत नारनवरे (आयएएस), कुलसचिव डॉ. विजय खंडाळ यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
नागपूर जिल्ह्यामध्ये पर्यावरण संवर्धन हवामान बदलांच्या आव्हानांना तोंड देणे हरित नागपूर घडविणे तसेच भावी पिढीमध्ये वृक्ष संवर्धनाची जाणीव निर्माण करणे या उद्देशाने केंद्र शासनाच्या वतीने २५ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प घेण्यात आलेला आहे. या अभियान अंतर्गत जमनालाल बजाज प्रशासकीय परिसरात १००० वृक्ष लागवड करण्याचे विद्यापीठाने ठरविले आहे. या अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक कुलसचिव श्री गणेश कुमकुमवार, उद्यान अधीक्षक श्री. प्रवीण गोतमारे, विद्यापीठ अभियंता श्री. विनोद इलमे, उद्यान व अभियंता तसेच सामान्य प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य, सन्माननीय अधिसभा सदस्य, विद्वत परिषदेचे सदस्य, सांविधिक अधिकारी, विविध शैक्षणिक विभागांचे प्रमुख, शिक्षक अधिकारी कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.