23.07.2026: राज्यपालांचे लोकमान्य टिळक यांना अभिवादन
राज्यपालांचे लोकमान्य टिळक यांना अभिवादन
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १७० व्या जयंती निमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी गुरुवारी (दि. २३) लोकभवन, मुंबई येथे लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सहसचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे तसेच लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.