17.07.2026: पंतप्रधानांच्या हस्ते पुनवर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचे उदघाटन
पंतप्रधानांच्या हस्ते पुनवर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचे उदघाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत आज देशातील ७७ पुनवर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचे उदघाटन संपन्न झाले. यामध्ये राज्यातील नांदुरा व बारामती या दोन पुनर्विकसित अमृत स्थानकांचे देखील उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा हे पुणे येथील लोकभवन येथून दुरस्थ माध्यमातून उपस्थित होते.
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ अत्याधुनिक अमृत रेल्वे स्थानकांचे तसेच महाराष्ट्रातील बारामती आणि नांदुरा या दोन पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.