बंद

    08.07.2026: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समताधिष्ठित भारताच्या निर्मितीसाठी प्रेरणादायी – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    प्रकाशित तारीख : July 9, 2026
    08.07.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८१ वा स्थापना दिवस मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाला. राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक ८ जुलै १९४५ रोजी या संस्थेची स्थापना केली होती. या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते सोसायटीतर्फे देण्यात येणारा ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार २०२६’ विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे तसेच उद्योजक पद्मश्री अशोक खाडे यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री तसेच  पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रामदास आठवले, भदंत डॉ राहुल बोधी महाथेरो, सोसायटीचे विश्वस्त अॅड. उज्ज्वल निकम, विश्वस्त अॅड. बी. के. बर्वे, डॉ वेंकट स्वामी व अरविंद सोनटक्के, सोसायटीचे सचिव डॉ. वासुदेव गाडे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सोसायटीच्या कार्यकारिणीचे सदस्य चंद्रशेखर कांबळे तसेच पुरस्काराचे मानकरी उपस्थित होते.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समताधिष्ठित भारताच्या निर्मितीसाठी प्रेरणादायी – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्याय, समता आणि वंचित घटकांच्या उत्थानासाठी आयुष्यभर संघर्ष केला. समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांना शिक्षण, सन्मान, समान संधी आणि न्याय मिळावा यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. डॉ आंबेडकर यांचे विचार समताधिष्टीत भारताच्या निर्मितीसाठी मार्गदर्शक आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज येथे केले.

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ८१ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होताना राज्यपाल बोलत होते.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आपल्याला समाजातील विषमता, जातीयवाद, उच्च-नीचतेची भावना तसेच स्त्री-पुरुष भेदभाव मिटवण्याचा संदेश देतो. समाजातील प्रत्येक व्यक्ती सक्षम आणि सशक्त व्हावी यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाला समान संधी आणि आत्मसन्मान देणारा भारत घडविणे हीच डॉ. आंबेडकरांना खरी आदरांजली ठरेल, असे राज्यपालांनी सांगितले.

    समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केल्याने इतरांनाही उत्कृष्ट कार्य करण्याची तसेच राष्ट्र आणि समाजकार्याला वाहून घेण्याची प्रेरणा मिळते. अशा पुरस्कारांमुळे समाजात सकारात्मक विचार, परिश्रमाची वृत्ती आणि राष्ट्रसेवेची भावना अधिक दृढ होते असे राज्यपालांनी नमूद केले.

    ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘विकसित भारत’ या संकल्पना साकार करण्यासाठी तसेच भारताला जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विकास सर्वसमावेशक असणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक घटक विकासाच्या प्रवाहात सहभागी झाल्यास हे ध्येय सध्या होईल,असेही राज्यपालांनी सांगितले.

    यावेळी राज्यपालांच्या हस्ते विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ नीलम गोर्हे व उद्योजक पद्मश्री डॉ अशोक खाडे यांना सोसायटीतर्फे देण्यात येणारा ‘भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

    कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री तसेच पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रामदास आठवले, भदंत डॉ राहुल बोधी महाथेरो, सोसायटीचे विश्वस्त अॅड. उज्ज्वल निकम, विश्वस्त अॅड. बी. के. बर्वे, डॉ वेंकट स्वामी व अरविंद सोनटक्के, सोसायटीचे सचिव डॉ. वासुदेव गाडे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सोसायटीच्या कार्यकारिणीचे सदस्य चंद्रशेखर कांबळे तसेच पुरस्काराचे मानकरी उपस्थित होते.

    **

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर के विचार समतामूलक भारत के निर्माण के लिए प्रेरणास्रोत – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    भारतीय संविधान के शिल्पकार एवं भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ने सामाजिक न्याय, समानता तथा वंचित वर्गों के उत्थान के लिए आजीवन संघर्ष किया। समाज के वंचित एवं उपेक्षित वर्गों को शिक्षा, सम्मान, समान अवसर और न्याय दिलाने के लिए उन्होंने अपना संपूर्ण जीवन समर्पित किया। डॉ. आंबेडकर के विचार समतामूलक भारत के निर्माण के लिए आज भी मार्गदर्शक हैं। यह प्रतिपादन महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने आज यहां किया।

    राज्यपाल मुंबई में डॉ. बाबासाहेब आंबेडकर द्वारा स्थापित पीपल्स एजुकेशन सोसायटी के 81वें स्थापना दिवस समारोह को संबोधित कर रहे थे।

    राज्यपाल ने कहा कि डॉ. बाबासाहेब आंबेडकर की विरासत हमें समाज में व्याप्त असमानता, जातिवाद, ऊंच-नीच की भावना तथा लैंगिक भेदभाव को समाप्त करने का संदेश देती है। समाज के प्रत्येक व्यक्ति को सक्षम और सशक्त बनाने के लिए सभी को मिलकर कार्य करना होगा। प्रत्येक नागरिक को समान अवसर और आत्मसम्मान प्राप्त हो, ऐसा भारत बनाना ही डॉ. आंबेडकर के प्रति सच्ची श्रद्धांजलि होगी।

    उन्होंने कहा कि समाज में उत्कृष्ट कार्य करने वाले व्यक्तियों का सम्मान करने से अन्य लोगों को भी उत्कृष्ट कार्य करने तथा राष्ट्र और समाज की सेवा के लिए स्वयं को समर्पित करने की प्रेरणा मिलती है। ऐसे पुरस्कार समाज में सकारात्मक सोच, परिश्रम की भावना और राष्ट्रसेवा के संस्कारों को और अधिक सुदृढ़ करते हैं।

    राज्यपाल ने कहा कि ‘आत्मनिर्भर भारत’ और ‘विकसित भारत’ के संकल्प को साकार करने तथा भारत को विश्व की तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनाने के लक्ष्य की प्राप्ति के लिए विकास का समावेशी होना आवश्यक है। समाज का प्रत्येक वर्ग विकास की मुख्यधारा से जुड़ेगा, तभी यह लक्ष्य प्राप्त किया जा सकेगा।

    इस अवसर पर राज्यपाल ने महाराष्ट्र विधान परिषद की पूर्व उपसभापति डॉ. नीलम गोर्हे तथा उद्योगपति पद्मश्री डॉ. अशोक खाड़े को पीपल्स एजुकेशन सोसायटी की ओर से प्रदान किया जाने वाला ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’ प्रदान किया।

    कार्यक्रम में केंद्रीय सामाजिक न्याय एवं अधिकारिता राज्य मंत्री तथा पीपल्स एजुकेशन सोसायटी के अध्यक्ष रामदास आठवले, भदंत डॉ. राहुल बोधि महाथेरो, सोसायटी के न्यासी एडवोकेट उज्ज्वल निकम, एडवोकेट बी. के. बर्वे, डॉ. वेंकट स्वामी, अरविंद सोनटक्के, सोसायटी के सचिव डॉ. वासुदेव गाडे, राज्यपाल के सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सोसायटी की कार्यकारिणी के सदस्य चंद्रशेखर कांबले तथा पुरस्कार प्राप्तकर्ता उपस्थित थे।

    **