बंद

    01.07.2026: राज्यपाल, एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉ. दीपक सावंत यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

    प्रकाशित तारीख : July 1, 2026
    01.07.2026: राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी लिहिलेल्या क्लायमेट चेंज, एक चक्रव्यूह या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लोकभवन मुंबई येथे आज पार पडले. जागतिक वातावरण बदल या विषयावर विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लेखांचे अध्ययन करुन सदर पुस्तक संकलित केले असल्याचे डॉ सावंत यांनी यावेळी सांगितले. या पुस्तकामध्ये हवामान बदलाचा चक्रव्यूह, हवामान बदल आणि मृदा, हवामान बदल आणि जीवघेणे आजार, हवामान बदल आणि अन्नसुरक्षा, कुपोषण आणि हवामान बदल आदी प्रकरणाचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

    राज्यपाल, एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉ. दीपक सावंत यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

    हवामान बदलांमुळे एक दिवस गेटवे ऑफ इंडिया, शिवाजी पार्क पाण्याखाली जाईल : डॉ दीपक सावंत

    राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी लिहिलेल्या ‘क्लायमेट चेंज, एक चक्रव्यूह’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लोकभवन मुंबई येथे आज पार पडले.

    वातावरण बदलांमुळे जगातील विकसित आणि विकसनशील दोन्ही देश बाधित होत आहेत. हवामान बदलाचे चटके आजच आपण सोसत आहोत. हवामान बदलाचा मोठा फटका समाजातील शेवटच्या स्तरावरील लोकांना बसतो. त्यामुळे आपली ध्येयधोरणे ठरवताना हवामान बदलाचा विचार करावा लागेल असे प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी बोलताना केले.

    निसर्गाविरुद्ध जाऊन मानवाला जगता येणार नाही तर त्याला निसर्गाशी जुळवून वाटचाल करावी लागेल असे त्यांनी यावेळी सांगितले. पूर्वी ‘विकास की पर्यावरण’ या विषयावर चर्चा व्हायची. परंतु आज शाश्वत विकासावर चर्चा होत आहे ही समाधानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरण रक्षण ही सर्वांची जबाबदारी असून त्या दृष्टीने वृक्षारोपण व जलसंवर्धनाचे कार्य झाले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

    उत्तरपूर्वेकडील राज्यात ‘अतिथी देवो भव’ म्हणतात त्याप्रमाणे ‘प्रकृति देवो भव’ असे म्हटले जाते, असे राज्यपालांनी सांगितले. ‘क्लायमेट चेंज, एक चक्रव्यूह’ हे पुस्तक मराठी भाषेतून लिहिल्याबद्दल राज्यपालांनी डॉ दीपक सावंत यांचे अभिनंदन केले.

    जागतिक हवामान बदलत होत आहेत तसे राजकीय हवामान देखील बदलत आहे असे सांगून डॉ दीपक सावंत यांचे ‘क्लायमेट चेंज’ हे पुस्तक दीपस्तंभाप्रमाणे जनसामान्यांना मार्गदर्शक ठरेल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

    हवामान बदलामुळे अतिवृष्टी, अनावृष्टी, गारपीट, अवर्षण आदी गोष्टी वारंवार घडत आहेत. हवामान बदलाचे हे चक्रव्यूह तोडण्यासाठी सर्वांना काम करावे लागेल असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

    हवामान बदलांमुळे कुपोषण वाढेल, जीवनशैलीशी निगडित आजार वाढतील, डेंग्यू, चिकन गुनिया सारखे आजार वाढतील असा इशारा डॉ सावंत यांनी दिला. काही वर्षांनी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया व शिवाजी पार्क पाण्याखाली जाईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. हवामान बदल हा विषय आपण २०१० साली सभागृहात मांडला होता व भविष्यात देखील तो मांडण्याची संधी मिळेल असे डॉ सावंत यांनी सांगितले.
    जागतिक वातावरण बदल या विषयावर विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लेखांचे अध्ययन करुन सदर पुस्तक संकलित केले असल्याचे डॉ सावंत यांनी यावेळी सांगितले. या पुस्तकामध्ये हवामान बदलाचा चक्रव्यूह, हवामान बदल आणि मृदा, हवामान बदल आणि जीवघेणे आजार, हवामान बदल आणि अन्नसुरक्षा, कुपोषण आणि हवामान बदल आदी प्रकरणाचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

    क्लायमेट चेंज एक चक्रव्यूह हे आपले दहावे पुस्तक असून पुढील पुस्तक ‘वाघाचे मानसशास्त्र Tiger Psychology’ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
    *****
    राज्यपाल जिष्णु देव वर्मा एवं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे के करकमलों से डॉ. दीपक सावंत की पुस्तक का लोकार्पण
    “जलवायु परिवर्तन के कारण एक दिन गेटवे ऑफ इंडिया और शिवाजी पार्क जलमग्न हो सकते हैं” – डॉ. दीपक सावंत

    महाराष्ट्र के पूर्व स्वास्थ्य मंत्री डॉ. दीपक सावंत द्वारा लिखित पुस्तक ‘क्लायमेट चेंज: एक चक्रव्यूह’ का लोकार्पण आज मुंबई स्थित महाराष्ट्र लोकभवन में राज्यपाल जिष्णु देव वर्मा के करकमलों से तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे की उपस्थिति में संपन्न हुआ।

    इस अवसर पर राज्यपाल ने कहा कि जलवायु परिवर्तन का प्रभाव आज विकसित और विकासशील, दोनों प्रकार के देशों पर स्पष्ट रूप से दिखाई दे रहा है। इसके दुष्परिणामों का सामना मानव समाज पहले से ही कर रहा है, और इसका सबसे अधिक असर समाज के अंतिम पायदान पर खड़े गरीब एवं वंचित वर्गों पर पड़ता है। इसलिए विकास संबंधी नीतियों और योजनाओं के निर्माण में जलवायु परिवर्तन को केंद्र में रखना समय की आवश्यकता है।

    राज्यपाल ने कहा कि मानव प्रकृति के विरुद्ध जाकर नहीं जी सकता, बल्कि उसे प्रकृति के साथ सामंजस्य स्थापित कर आगे बढ़ना होगा। उन्होंने कहा कि एक समय “विकास बनाम पर्यावरण” पर चर्चा होती थी, किंतु आज “सतत एवं टिकाऊ विकास (Sustainable Development)” वैश्विक विमर्श का केंद्र बन चुका है, जो एक सकारात्मक परिवर्तन है।

    उन्होंने कहा कि पर्यावरण संरक्षण प्रत्येक नागरिक की सामूहिक जिम्मेदारी है तथा वृक्षारोपण, जल संरक्षण और प्राकृतिक संसाधनों के संवर्धन को जन-आंदोलन का स्वरूप दिया जाना चाहिए।

    राज्यपाल ने उत्तर-पूर्व भारत की सांस्कृतिक परंपरा का उल्लेख करते हुए कहा कि जिस प्रकार “अतिथि देवो भव” भारतीय संस्कृति का मूल मंत्र है, उसी प्रकार वहां “प्रकृति देवो भव” की भावना भी जीवन का अभिन्न अंग है। उन्होंने मराठी भाषा में जलवायु परिवर्तन जैसे महत्वपूर्ण वैश्विक विषय पर पुस्तक लिखने के लिए डॉ. दीपक सावंत की सराहना करते हुए उन्हें बधाई दी।

    उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे ने अपने संबोधन में कहा कि जिस प्रकार विश्व का जलवायु परिवर्तित हो रहा है, उसी प्रकार राजनीतिक परिस्थितियाँ भी निरंतर बदल रही हैं। उन्होंने विश्वास व्यक्त किया कि ‘क्लायमेट चेंज: एक चक्रव्यूह’ आमजन के लिए दीपस्तंभ की भांति मार्गदर्शक सिद्ध होगी।

    उन्होंने कहा कि जलवायु परिवर्तन के कारण अतिवृष्टि, अल्पवृष्टि, ओलावृष्टि, सूखा तथा अन्य प्राकृतिक आपदाएँ लगातार बढ़ रही हैं। इस जटिल चुनौती से निपटने के लिए सरकार, समाज और प्रत्येक नागरिक को मिलकर कार्य करना होगा।

    अपने विचार व्यक्त करते हुए डॉ. दीपक सावंत ने चेतावनी दी कि जलवायु परिवर्तन के कारण भविष्य में कुपोषण, जीवनशैली से जुड़ी बीमारियाँ तथा डेंगू और चिकनगुनिया जैसी संक्रामक बीमारियों में वृद्धि हो सकती है। उन्होंने आशंका व्यक्त की कि यदि समय रहते प्रभावी कदम नहीं उठाए गए, तो आने वाले वर्षों में मुंबई के गेटवे ऑफ इंडिया तथा शिवाजी पार्क जैसे प्रमुख स्थल समुद्र के बढ़ते जलस्तर के कारण जलमग्न हो सकते हैं।

    डॉ. सावंत ने बताया कि उन्होंने वर्ष 2010 में भी विधानसभा में जलवायु परिवर्तन का मुद्दा उठाया था और भविष्य में भी इस विषय पर जनजागरण जारी रखेंगे।

    उन्होंने कहा कि यह पुस्तक जलवायु परिवर्तन पर उपलब्ध अनेक राष्ट्रीय एवं अंतरराष्ट्रीय शोध-पत्रों, लेखों तथा अध्ययनों के गहन अध्ययन के आधार पर तैयार की गई है। इसमें जलवायु परिवर्तन का चक्रव्यूह, जलवायु परिवर्तन और मृदा, जलवायु परिवर्तन एवं घातक रोग, जलवायु परिवर्तन और खाद्य सुरक्षा, कुपोषण तथा जलवायु परिवर्तन जैसे महत्वपूर्ण विषयों का विस्तृत विश्लेषण किया गया है।

    डॉ. सावंत ने बताया कि ‘क्लायमेट चेंज: एक चक्रव्यूह’ उनकी दसवीं पुस्तक है तथा उनकी अगली पुस्तक ‘टाइगर साइकोलॉजी (Tiger Psychology)’ शीघ्र ही प्रकाशित होगी।
    *****