01.07.2026 : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना राज्यपालांचे अभिवादन
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन मुंबई येथे वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
यावेळी राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे तसेच लोकभवनातील कर्मचारी व अधिकारी तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.