27.06.2026 : सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत) विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभातील राज्यपालांचे भाषण
27.06.2026 : सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पदवीदान समारंभ-२०२६ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या लवळे, पुणे येथील शैक्षणिक संकुलात संपन्न झाला. यावेळी सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष,अभिमत विद्यापीठाचे कुलपती प्रा. डॉ. एस. बी. मुजुमदार, प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरु डॉ. रामकृष्णन रामन, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, मुंबई येथील फ्रान्सचे वाणिज्यदूत पॅट्रिक लेव्हेरिनो, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष हेन्री तेबांडेके आदी उपस्थित होते. प्र-कुलपती डॉ. येरवडेकर यांनी प्रास्ताविकात विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक प्रगती सोबत सिम्बायोसिस संस्थेच्या प्रगतीचा आलेख मांडला.