10.06.2026: राज्यपालांच्या उपस्थितीत लेक्सिकॉन ग्रुप व पुणे टाइम्स मिररने आयोजित ‘बिग सॅल्युट – ऑनरिंग हिरोज इन खाकी’ हा कार्यक्रम संपन्न
10.06.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिसांच्या कार्याचा सन्मान करणारा ‘बिग सॅल्युट – ऑनरिंग हिरोज इन खाकी’ हा कार्यक्रम पुणे येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन लेक्सिकॉन ग्रुप व पुणे टाइम्स मिररने केले होते. यावेळी पुणे टाइम्स मिररच्या मुंबई आवृत्तीचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सतत कर्तव्यदक्ष असलेल्या पोलिसांच्या कार्याचा सन्मान करण्याचा लेक्सिकॉन समुहाचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे राज्यपालांनी नमूद केले. कार्यक्रमाला पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संजय दराडे, लेक्सिकॉन ग्रुपचे अध्यक्ष पंकज शर्मा, उपाध्यक्ष नीरज शर्मा, सामाजिक कार्यकर्ते डॉ. वेदप्रकाश शर्मा, पुणे टाइम्स मिररच्या संचालक शीतल बियाणी, लेक्सिकॉन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे चेअरमन सुखदेव शर्मा आदी उपस्थित होते.