09.06.2026: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थित मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकारांचे महाअधिवेशन संपन्न
09.06.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थित मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित ‘महा पत्रकार अधिवेशन’ पार पडले. पत्रकारांनी सामान्य नागरिक तसेच समाजातील वंचित घटकांच्या समस्या सातत्याने प्रकाश झोतात आणत राहाव्यात, असे राज्यपालांनी आवाहन केले.
याप्रसंगी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, गौर गोपाल दास, सकाळ मीडिया समूहाचे समूह संपादक निलेश खरे, ज्येष्ठ पत्रकार सरिता कौशिक आणि मृणालिनी नानिवडेकर, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, पत्रकार संघटनेचे पदाधिकारी तसेच राज्यभरातील विविध भागांतून आलेले पत्रकार उपस्थित होते.