09.06.2026: भगवान बिरसा मुंडा यांच्या १२६ व्या बलिदान दिनानिमित्त राज्यपालांकडून विनम्र अभिवादन
09.06.2026: क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १२६ व्या बलिदान दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात भगवान बिरसा मुंडांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी राज्यपालांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेसह १५ आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेला देखील पुष्प अर्पण करून अभिवादन केले व वृक्षारोपण केले. कार्यक्रमात भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदानावर आधारित चित्रफित दाखविण्यात आली. यावेळी आदिवासी कलाकारांनी लोकनृत्य सादर केले. कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आदिवासी समाजातील विविध खासदार व आमदार, ज्येष्ठ तारपा वादक व लोककलावंत पद्मश्री भिकल्या धिंडा तसेच निमंत्रित उपस्थित होते