08.06.2026: ‘युवा संगम’ कार्यक्रमांतर्गत राज्यपालांचा विद्यार्थ्यांशी संवाद
08.06.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज आंध्रप्रदेशातील विद्यार्थी प्रतिनिधींसोबत ‘युवा संगम’ कार्यक्रमांतर्गत लोकभवन, मुंबई येथे संवाद साधला. हा कार्यक्रम भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे तर्फे आयोजित करण्यात आला होता. यावेळी उच्च शिक्षण विभागचे उपसचिव श्रेयांश मोहन, भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे येथील प्रसार व प्रशिक्षण कार्यक्रम वरिष्ठ तांत्रिक अधिकारी डॉ. मनवा दिवेकर तसेच वरिष्ठ प्रधान तांत्रिक अधिकारी डॉ. शांती कलीपटनपू, तिरुपती येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील मानव व सामाजिक विज्ञान विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. बिभूती कच्छप, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे सहसचिव एस. रामामूर्ती, आयआयएसईआर येथील प्रसार व प्रशिक्षण कार्यक्रम प्रकल्प व्यवस्थापक नितीन तिवाणे, आंध्रप्रदेशातील विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाचे सदस्य, आयसरचे कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.