Zoom 08.06.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज आंध्रप्रदेशातील विद्यार्थी प्रतिनिधींसोबत ‘युवा संगम’ कार्यक्रमांतर्गत लोकभवन, मुंबई येथे संवाद साधला. हा कार्यक्रम भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे तर्फे आयोजित करण्यात आला होता. यावेळी उच्च शिक्षण विभागचे उपसचिव श्रेयांश मोहन, भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे येथील प्रसार व प्रशिक्षण कार्यक्रम वरिष्ठ तांत्रिक अधिकारी डॉ. मनवा दिवेकर तसेच वरिष्ठ प्रधान तांत्रिक अधिकारी डॉ. शांती कलीपटनपू, तिरुपती येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील मानव व सामाजिक विज्ञान विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. बिभूती कच्छप, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे सहसचिव एस. रामामूर्ती, आयआयएसईआर येथील प्रसार व प्रशिक्षण कार्यक्रम प्रकल्प व्यवस्थापक नितीन तिवाणे, आंध्रप्रदेशातील विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाचे सदस्य, आयसरचे कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
08.06.2026: Governor of Maharashtra Jishnu Dev Varma today interacted with a student delegation from Andhra Pradesh organised by the Indian Institute of Science Education and Research (IISER) Pune under the YUVA Sangam Programme, implemented as part of Ek Bharat Shreshtha Bharat initiative at Lok Bhavan, Mumbai