02.06.2026: राज्यपालांनी म्यानमार प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष उ मिन आँग लॉन्ग यांचे मुंबई विमानतळावर केले स्वागत
02.06.2026: सध्या भारत दौऱ्यावर असलेले म्यानमार प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष उ मिन आँग लॉन्ग यांचे मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल हे देखील उपस्थित होते. म्यानमारच्या राष्ट्राध्याक्ष्यांच्या सन्मानार्थ राज्यपालांनी आज संध्याकाळी लोकभवन येथे स्वागत समारंभाचे आयोजन केले आहे.