29.05.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची भागवत कथा महायज्ञाला भेट
Zoom 29.05.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी पुरुषोत्तम मासानिमित्त जोगेश्वरी मुंबई येथे सुरु असलेल्या श्रीमद् भागवत कथा महायज्ञाला भेट देऊन उपस्थित भाविक श्रोत्यांशी संवाद साधला.
श्रीमद भागवत ही चारित्र्य संपन्न समाज घडविणारी कथा असून त्यातून आदर्श जीवन जगण्याचे मार्गदर्शन होते असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. यावेळी राज्यपालांनी कथाकर्ता श्री महावीर शरण शास्त्री यांचा सत्कार केला तसेच श्रीमद्भागवत महायज्ञ आयोजक सावरकर फाउंडेशनचे अभिनंदन केले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष व नगरसेवक रुपेश सावरकर उपस्थित होते.
29.05.2026: Maharashtra Governor Jishnu Dev Varma visited the Shrimad Bhagwat Katha Mahayajna Satsang organised on the occasion of Purushottam Maas at Jogeshwari, Mumbai. Addressing the audience, the Governor said the Shrimad Bhagwat Katha has the power to transform the youth and instill ethics and moral values in society. The Governor felicitated Katha Karta Mahavir Sharan Shastri and congratulated the Savarkar Foundation, for organizing the Shrimad Bhagwat Saptah. President of the Foundation Rupesh Savarkar was also present.