21.05.2026: माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबईत शांती परिषदेचे उदघाटन
21.05.2026: भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि. २१ मे) ‘बिलियनेअर्स फॉर पीस कॉन्क्लेव्ह’ या एकदिवसीय शांती परिषदेचे उदघाटन हॉटेल ग्रँड ह्यात मुंबई येथे करण्यात आले. या परिषदेचे आयोजन वॉकहार्ड फाउंडेशन आणि ‘आय अॅम पीसकीपर’ या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. परिषदेच्या उदघाटन सत्रामध्ये रामनाथ कोविंद व राज्यपालांच्या हस्ते ४ नोबेल शांती पदक पुरस्कार विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. उदघाटन सत्राला माजी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद, रा.स्व.संघाचे माजी सरकार्यवाह सुरेश (भैय्याजी) जोशी, वॉकहार्ड फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ हुजेफा खोराकीवाला, समीना खोराकीवाला, नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी, ग्रेगरी लिओपोल्डोविच पेलमन (रशिया), हुसीन अब्बासी (ट्युनिशिया) व प्रा. मोहन मुनासिंघे (श्रीलंका) उपस्थित होते.