बंद

    16.05.2026: सिक्कीम राज्य स्थापना दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    प्रकाशित तारीख : May 18, 2026
    18.05.2026: मतिमंद व अनाथ मुलांचे पालक शंकरबाबा पापळकर यांनी मुंबईत आयोजित केलेल्या काष्ठशिल्प कलाकृतींच्या प्रदर्शनाला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी भेट दिली व दिव्यांग कलाकारांनी तयार केलेल्या कलाकृतींचे अवलोकन केले. यावेळी राज्यपालांनी काष्ठ शिल्प कलाकारांशी संवाद साधला तसेच शंकरबाबा पापळकर यांच्या कार्याचे कौतुक केले. शंकरबाबा पापळकर यांनी यावेळी राज्यपालांना विविध काष्ठशिल्पांच्या वैशिष्ट्याची माहिती दिली. आगमनप्रसंगी शंकरबाबा पापळकर तसेच पु ल देशपांडे अकादमीच्या संचालिका मीनल जोगळेकर यांनी राज्यपालांचे स्वागत केले. पद्मश्री शंकर बाबा पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्व. अंबादास पंत वैद्य बेवारस दिव्यांग बालगृह, वझ्झर, जिल्हा अमरावती येथील अनाथ मुलांनी सागवान व बेल आदी लाकडापासून विविध काष्ठशिल्पे साकारली असून या कलाकृती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहे. काष्ठ कलाकृतींचे प्रदर्शन दिनांक १८ मे पर्यंत सर्वांसाठी खुले आहे.  यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कलादालनाच्या क्युरेटर वर्षा कारळे तसेच छायाचित्रकार शिरीष कारळे उपस्थित होते.

    सिक्कीम राज्य स्थापना दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    सिक्कीम राज्य स्थापना दिनाचे औचित्य साधून मुंबईत कार्यरत असलेल्या सिक्कीम येथील व्यावसायिक तसेच विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाने आज महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची महाराष्ट्र लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

    आज साजरा होत असलेल्या सिक्कीम राज्य स्थापने दिनानिमित्त राज्यपालांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्याशी संवाद साधला.

    शिष्टमंडळाने सिक्कीममधील पर्यटन क्षेत्राच्या झपाट्याने होत असलेल्या विकासाबाबत तसेच हिमालयीन प्रदेशातील नाजूक पर्यावरणीय संतुलन जपत पर्यटन अधिक शाश्वत आणि पर्यावरणपूरक करण्याच्या गरजेबाबत राज्यपालांशी चर्चा केली. वाढत्या पर्यटक संख्येचे योग्य नियमन करून सिक्कीमच्या जैवविविधतेचे आणि नैसर्गिक वारशाचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

    यावेळी सिक्कीमसह ईशान्य भारतातील विद्यार्थी आणि व्यावसायिक देशभरात उद्योजकता, तंत्रज्ञान, नवोन्मेष, संशोधन तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती करत असून राष्ट्रीय विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचा उल्लेखही करण्यात आला.

    राज्यपालांनी यावेळी ईशान्य भारतातील विविध समुदायांना परस्पर संवाद, ज्ञानविनिमय आणि सहकार्याच्या व्यासपीठावर एकत्र आणण्याच्या आपल्या संकल्पनेविषयी माहिती दिली. हैदराबाद टेक मीटच्या धर्तीवर ईशान्य भारतासाठी तंत्रज्ञान आणि नवोन्मेष केंद्रित विशेष परिषद आयोजित करण्याची कल्पना त्यांनी यावेळी मांडली.

    यावेळी मातृका घिमिरे, एस. झांगपो भुतिया, अच्युत दहल, युनिता पांडे, दिग्विजय प्रवीण पटेल, फुरबा केनझेन शेर्पा, चोडेन शेर्पा, केनशा शेर्पा, फुंत्सोक रिंझेन शेर्पा, अनुप मुखिया व स्वीकार खाटीवाडा आदी उपस्थित होते.