बंद

    13.05.2026: इंधन बचतीसाठी ताफा कमी करण्याची राज्यपालांची सूचना

    प्रकाशित तारीख : May 13, 2026

    इंधन बचतीसाठी ताफा कमी करण्याची राज्यपालांची सूचना
    गृह विभागाला सुरक्षा ताफा तर्कसंगत करण्याचे निर्देश

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार पेट्रोल व डिझेलचा वापर कमी करण्याच्या आणि मर्यादित संसाधनांच्या कार्यक्षम वापरास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने सूचना केल्या आहेत.

    राज्यपालांनी राज्य शासनाच्या गृह विभागाला विद्यमान सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याची शक्यता तपासण्याचे निर्देश दिले आहेत.

    गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांना पाठविलेल्या पत्रात राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी राज्यपालांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन ऊर्जा बचतीच्या अनुषंगाने वाहनांची संख्या निर्धारित करण्याच्या राज्यपालांच्या सूचना कळवल्या आहेत.

    मर्यादित संसाधनांचा जबाबदारीने वापर करण्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्यपालांनी सदर सूचना केल्या आहेत.

    **
    ईंधन बचत के लिए राज्यपाल ने काफिला कम करने के निर्देश दिए
    गृह विभाग को सुरक्षा काफिले को तर्कसंगत बनाने के निर्देश

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा पेट्रोल और डीजल की खपत कम करने तथा सीमित संसाधनों के अधिक कार्यक्षम उपयोग को प्रोत्साहन देने के आह्वान के अनुरूप महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने अपने काफिले में वाहनों की संख्या कम करने के संबंध में निर्देश दिए हैं।

    राज्यपाल ने राज्य शासन के गृह विभाग को वर्तमान सुरक्षा व्यवस्था की समीक्षा कर उनके काफिले में वाहनों की संख्या कम करने की संभावनाओं का परीक्षण करने के निर्देश दिए हैं।

    गृह विभाग की अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर को भेजे गए पत्र में राज्यपाल के सचिव डॉ. प्रशांत नारनवरे ने राज्यपाल के निर्देशों से अवगत कराया है।

    पत्र में राज्यपाल की सुरक्षा व्यवस्था की समीक्षा कर ऊर्जा बचत के दृष्टिकोण से वाहनों की संख्या निर्धारित करने को कहा गया है।

    सीमित संसाधनों के जिम्मेदारीपूर्ण उपयोग को प्रोत्साहित करने के उद्देश्य से राज्यपाल ने यह निर्देश दिए हैं।

    **