12.05.2026: राज्यपालांची जहांगीर आर्ट गॅलरी येथे “भूमिजा — बॉर्न ऑफ द अर्थ” या कला प्रदर्शनाला भेट
12.05.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. जिष्णु देव वर्मा यांनी आज मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कलाकार श्रीमती तपती भौमिक मजूमदार यांच्या “भूमिजा — बॉर्न ऑफ द अर्थ” या कला प्रदर्शनाला भेट दिली. या प्रसंगी श्रीमती तपती भौमिक मजूमदार यांनी राज्यपालांचे स्वागत केले. १२ ते १८ मे २०२६ दरम्यान चालणाऱ्या या प्रदर्शनात निसर्ग, पारंपरिक वस्त्रकला आणि सांस्कृतिक अलंकारांवर आधारित आधुनिक कलाकृतींचा समावेश आहे. राज्यपालांनी कलाकृतींच्या सर्जनशीलतेचे आणि गहनतेचे कौतुक करत भारताच्या समृद्ध सांस्कृतिक व कलात्मक वारशात कलाकारांच्या योगदानाचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाला अभिनेत्री जयती भाटिया, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे प्राध्यापक श्री. मारुती शेळके, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कलाकार श्रीमती तपती भौमिक मजूमदार तसेच इतर कला प्रेमी यावेळी उपस्थित होते.