11.05.2026 : सोमनाथ स्वाभिमान पर्वाचे औचित्य साधून राज्यपालांनी केली श्री धाकलेश्वर महादेव मंदिरात जाऊन अभिषेक व पूजा
11.05.2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सोमनाथ येथे झालेल्या सोमनाथ स्वाभिमान पर्वाचे औचित्य साधून मुंबई येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महालक्ष्मी मंदिर परिसरातील श्री धाकलेश्वर महादेव मंदिरात जाऊन अभिषेक व पूजा केली. यावेळी राज्यपालांनी सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री आशिष शेलार यांचेसह पंतप्रधानांच्या सोमनाथ मंदिरातील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहिले. कार्यक्रमानंतर राज्यपालांनी सोमनाथ स्वाभिमान पर्वानिमित्त धाकलेश्वर मंदिर परिसरात आयोजित चित्र प्रदर्शनाला भेट दिली व उपस्थितांना संबोधित केले. कार्यक्रमाला राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ किरण कुलकर्णी, सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे, श्री धाकलेश्वर महादेव मंदिर न्यासाचे अध्यक्ष व विश्वस्त अशोक भन्साळी तसेच इतर विश्वस्त व भाविक उपस्थित होते.