05.05.2026 : मुंबई, बाटू व सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरुंनी राज्यापालांसमोर केले विद्यापीठाचे विस्तृत सादरीकरण
Zoom 05.05.2026 : मुंबई विद्यापीठासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ व सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुंनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांची भेट घेऊन आपापल्या विद्यापीठाचे विस्तृत सादरीकरण केले. विद्यापीठांचे आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय मानांकन कालबद्ध पद्धतीने वाढविण्याच्या दृष्टीने विद्यापीठ करीत असलेल्या कार्याची त्यांनी यावेळी माहिती दिली. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. रवींद्र कुलकर्णी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु प्रा. राजनीश कामत, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सुनील भिरूड तसेच मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरु प्रा. अजय भामरे उपस्थित होते.
05.05.2026 : मुंबई विद्यापीठासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ व सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुंनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांची भेट घेऊन आपापल्या विद्यापीठाचे विस्तृत सादरीकरण केले. विद्यापीठांचे आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय मानांकन कालबद्ध पद्धतीने वाढविण्याच्या दृष्टीने विद्यापीठ करीत असलेल्या कार्याची त्यांनी यावेळी माहिती दिली. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. रवींद्र कुलकर्णी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु प्रा. राजनीश कामत, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सुनील भिरूड तसेच मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरु प्रा. अजय भामरे उपस्थित होते.