बंद

    05.05.2026 : राज्यपालांच्या पुढाकाराने मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये टीबी मुक्त भारत अभियान राबवणार

    प्रकाशित तारीख : May 5, 2026
    राज्यपालांच्या पुढाकाराने मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये टीबी मुक्त भारत अभियान राबवणार

    राज्यपालांच्या पुढाकाराने मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये टीबी मुक्त भारत अभियान राबवणार

    अभियानात रेड क्रॉस तसेच विद्यापीठांना सहभागी करणार असल्याची राज्यपालांची माहिती

    मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये ‘टीबी मुक्त भारत’ अभियान राबवले जाईल व राज्याचा आरोग्य विभाग, मुंबई महानगर पालिका तसेच रेड क्रॉस सोसायटी व विद्यापीठांना या कार्यात सहभागी केले जाईल, अशी सूचना राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज येथे केली.

    राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. ५ मे) रेड क्रॉस सोसायटीच्या महाराष्ट्र शाखेची बैठक संपन्न झाली तसेच राज्यातील तीन विद्यापीठांच्या कुलगुरुंची स्वतंत्रपणे बैठक झाली, त्यावेळी राज्यपालांनी ही सूचना केली.

    पंतप्रधानांच्या सूचनेनुसार देशव्यापी टीबी मुक्त भारत अभियान राबवले जात आहे. परंतु लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये क्षयरोगाचा प्रसार वेगाने होतो. त्यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईतील कुर्ला तसेच इतर भागांमधील झोपडपट्ट्यांमध्ये टीबीमुक्त भारत अभियान राबवले जाईल असे राज्यपालांनी जाहीर केले.

    क्षयरोगाची तपासणी लवकर झाल्यास क्षयरोगावर नियंत्रण मिळवता येते. त्यामुळे आरोग्य विभाग व पालिकेतर्फे क्षयरोग तपासणी केली जाईल, तर टीबी संदर्भात माहिती, शिक्षण व जनजागृतीचे कार्य रेड क्रॉस महाराष्ट्र शाखेतर्फे केले जाईल असे राज्यपालांनी सांगितले. या अभियानात एनसीसी, स्काऊट – गाईड, रोटरी क्लब, युवा रेड क्रॉस स्वयंसेवक यांना देखल सहभागी करुन घेतले जाईल, असे राज्यपालांनी सांगितले. क्षय रुग्णांना पौष्टिक आहार देण्याची व्यवस्था करण्याचे राज्यपालांनी सांगितले.

    रेड क्रॉस सोसायटीने विद्यापीठांसोबत कार्य करावे व त्यांना देखील आपल्या कार्यात सहभागी करून घ्यावे अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

    रेड क्रॉस सोसायटीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कार्य जोमाने सुरु ठेवावे तसेच ज्या जिल्ह्यांमधील कार्य थांबले आहे तेथे नव्याने सुरु करावे अशी सूचना राज्यपालांनी केली. ज्या जिल्ह्यातर्फे उत्कृष्ट कार्य केले जाईल त्यांना लोक भवनातर्फे योग्य बक्षीस दिले जाईल असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

    कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाच्या मदतीने क्षयरोगाचा प्रादुर्भाव असलेल्या झोपडपट्ट्या शोधण्याच्या कार्यात विद्यापीठाने मदत करावी अशी सूचना राज्यपालांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या कुलगुरूंना केली.

    रेड क्रॉस सोसायटीच्या बैठकीला महाराष्ट्र शाखेचे उपाध्यक्ष सुरेश देवरा व इतर पदाधिकारी उपस्थित होते तर विद्यापीठांच्या बैठकीला मुंबई, ‘बाटू’ व सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित होते.

    *****

    राज्यपाल की पहल पर मुंबई की झोपड़पट्टियों में ‘टीबी मुक्त भारत’ अभियान चलाया जाएगा

    अभियान में रेड क्रॉस तथा विश्वविद्यालयों को शामिल किया जाएगा: राज्यपाल

    मई महीने के दूसरे सप्ताह में मुंबई की झोपड़पट्टियों में ‘टीबी मुक्त भारत’ अभियान चलाया जाएगा तथा राज्य के स्वास्थ्य विभाग, मुंबई महानगरपालिका, रेड क्रॉस सोसायटी और विश्वविद्यालयों को इस कार्य में सहभागी बनाया जाएगा, ऐसी जानकारी राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने आज यहां दी।

    राज्यपाल की अध्यक्षता में मंगलवार (5 मई) को रेड क्रॉस सोसायटी की महाराष्ट्र शाखा की बैठक आयोजित की गई। इसके अलावा राज्य के तीन विश्वविद्यालयों के कुलगुरुओं के साथ अलग से बैठक भी हुई, जिसमें राज्यपाल ने यह निर्देश दिए।

    प्रधानमंत्री के निर्देशानुसार देशभर में ‘टीबी मुक्त भारत’ अभियान चलाया जा रहा है। हालांकि, अधिक जनसंख्या घनत्व वाली झोपड़पट्टियों में क्षयरोग तेजी से फैलता है। इसलिए मई के दूसरे सप्ताह में मुंबई के कुर्ला तथा अन्य क्षेत्रों की झोपड़पट्टियों में यह अभियान चलाया जाएगा, ऐसा राज्यपाल ने घोषित किया।

    राज्यपाल ने कहा कि यदि क्षयरोग की जांच समय पर हो जाए तो उस पर नियंत्रण पाया जा सकता है। इस अभियान के तहत स्वास्थ्य विभाग और महानगरपालिका द्वारा टीबी की जांच की जाएगी, जबकि टीबी संबंधी जानकारी, शिक्षा और जनजागरूकता का कार्य रेड क्रॉस महाराष्ट्र शाखा द्वारा किया जाएगा।

    उन्होंने बताया कि इस अभियान में एनसीसी, स्काउट-गाइड, रोटरी क्लब और युवा रेड क्रॉस स्वयंसेवकों को भी शामिल किया जाएगा। साथ ही टीबी मरीजों के लिए पौष्टिक आहार की व्यवस्था करने के निर्देश भी दिए गए हैं।

    राज्यपाल ने रेड क्रॉस सोसायटी को विश्वविद्यालयों के साथ मिलकर कार्य करने और उन्हें भी अभियान में शामिल करने का सुझाव दिया।

    उन्होंने यह भी कहा कि रेड क्रॉस सोसायटी राज्य के सभी जिलों में अपने कार्य को तेज गति से आगे बढ़ाए और जहां कार्य बंद हो गया है, वहां पुनः शुरू करे। उत्कृष्ट कार्य करने वाले जिलों को लोक भवन की ओर से पुरस्कृत किया जाएगा।

    कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तकनीक की मदद से क्षयरोग प्रभावित झोपड़पट्टियों की पहचान करने के लिए विश्वविद्यालयों से सहयोग लेने के निर्देश भी राज्यपाल ने दिए।

    रेड क्रॉस सोसायटी की बैठक में महाराष्ट्र शाखा के उपाध्यक्ष सुरेश देवरा सहित अन्य पदाधिकारी उपस्थित थे, जबकि विश्वविद्यालयों की बैठक में मुंबई विश्वविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विश्वविद्यालय (‘बाटू’) और सीओईपी प्रौद्योगिकी विश्वविद्यालय के कुलगुरु उपस्थित थे।