01.05.2026 : शिवाजी पार्क येथे ६७ वा महाराष्ट्र राज्य स्थापना दिन साजरा : राज्यपालांची राष्ट्रध्वजाला मानवंदना
01.05.2026 : महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वज फडकावला, राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली व उपस्थितांना संबोधित केले. यावेळी राज्यपालांनी समारंभीय संचलनाचे निरीक्षण केले तसेच संचलनाकडून मानवंदना स्वीकारली. यावेळी राज्यपालांच्या पत्नी सुधा देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मुंबईच्या महापौर रितु तावडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबई महानगर पालिका आयुक्त अश्विनी भिडे, पोलीस आयुक्त देवेन भारती, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, मानद वाणिज्यदूत, सशस्त्र सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी तसेच प्रशासन व पोलीस दलातील सेवानिवृत्त अधिकारी व नागरिक उपस्थित होते.