बंद

    30.04.2026 : राज्यपालांच्या हस्ते चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकारांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन

    प्रकाशित तारीख : April 30, 2026
    30.04.2026 : राज्यपालांच्या हस्ते चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकारांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन

    देशातील पहिला कॅमेरा त्रिपुरातील ‘माणिक्य’ घराण्याकडे असल्याची माहिती

    राज्यपालांच्या हस्ते चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकारांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन

    कलकत्ता ‘सिटी ऑफ जॉय’ तर मुंबई ‘सिटी ऑफ होप”: राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    कलकत्ता हे शहर जसे ‘सिटी ऑफ जॉय’ म्हणून ओळखले जाते, तसे मुंबई हे शहर लाखो लोक व कलाकारांना नवी उमेद व उपजीविकेचे साधन देणारे ‘सिटी ऑफ होप’ आहे. असंख्य लोक मुंबईत स्वप्ने उराशी घेऊन येतात व ती स्वप्ने साकार देखील होतात, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी येथे केले.

    भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुंबईतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टतर्फे आयोजित चित्रपट कलाकारांच्या छायाचित्रांच्या तसेच चित्रपटांच्या पोस्टर्सच्या प्रदर्शनाचे गुरुवारी (दि. ३०) राज्यपालांच्या हस्ते उदघाटन झाले त्यावेळी ते बोलत होते.

    कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, अभिनेत्री हेमा मालिनी, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, कलाप्रेमी फिरोजा गोदरेज तसेच छायाचित्रण व चित्रपट उद्योगातील मान्यवर उपस्थित होते.

    भारतीय चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकारांच्या मेणाच्या प्रतिकृती असलेल्या भव्य संग्रहालयाची मुंबईत निर्मिती झाल्यास सामान्य जनता त्याचे खचितच स्वागत करेल असे सांगून बॉलिवूड म्युझियममुळे पर्यटनाला देखील चालना मिळेल असे राज्यपालांनी सांगितले.

    भारतीय चित्रपट सृष्टी कला व मनोरंजनावर आधारित सर्वात मोठा उद्योग असल्याचे सांगून चित्रपटांनी एकूणच मानवी जीवनाच्या विविध पैलूंचे सुंदर सादरीकरण केले असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

    चित्रपट क्षेत्रात कलाकारांप्रमाणेच दिग्दर्शक, निर्माते, छयाचित्रकार, संगीतकार , तंत्रज्ञ या सर्वांचे महत्वाचे योगदान असल्याचे सांगताना त्रिपुरातील आपल्या ‘माणिक्य’ घराण्यातील सचिन देव बर्मन व राहुल देव बर्मन यांच्या सांगीतिक योगदानाचे त्यांनी स्मरण दिले.

    भारतातील पहिले दोन कॅमेरे त्रिपुराचे महाराजे बीर चंद्र माणिक्य व इंदोरचे राजा दिन दयाल यांचेकडे होते अशी माहिती देताना आपण त्याच घराण्यातील असल्याचा अभिमान वाटतो असे राज्यपालांनी सांगितले.

    बॉलिवूडमुळे हिंदी भाषेला चालना मिळत आहे असे सांगून त्रिपुरा, नागालँड, मेघालय यांसह उत्तर पूर्वेतील अनेक राज्यांमधील लहान मुले बॉलिवूडमुळे हिंदी बोलायला शिकतात असे राज्यपालांनी सांगितले.

    बॉलिवूड देशाला एक करणारा सांस्कृतिक धागा असल्याचे सांगून त्यातून एकात्मतेला चालना मिळत असल्याचे उद्गार राज्यपालांनी यावेळी काढले.

    ‘लेन्स अँड लेगसी : बॉलिवूड इन फोकस’ या प्रदर्शनात विविध स्थिर छायाचित्रण कलाकारांनी काढलेली छायाचित्रे मांडली असून त्यातून चित्रपट सृष्टीचे उत्तम दस्तावेजीकरण झाले असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

    मुंबईने हिंदी चित्रपटांशिवाय नाटक, रंगभूमी, मराठी चित्रपट यांना देखील चालना दिली असल्यामुळे मुंबईचे महत्व कधीही कमी होणार नाही असे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी यावेळी सांगितले. आपल्या भाषणातून शेलार यांनी दादासाहेब फाळके, दिवंगत अभिनेते धर्मेंद्र व पार्श्वगायिका अशा भोसले यांना आदरांजली वाहिली.

    स्वप्ननगरी मुंबई ही आई : हेमा मालिनी

    मुंबई ही स्वप्न नगरी असून ही नगरी आईप्रमाणे प्रत्येक मुलाचे स्वागत करते. मुंबई ही चित्रपट नगरी असून या शहरात मोठ्या जागी चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकारांचे ‘मॅडम तुसॉ’ प्रमाणे संग्रहालय करावे अशी मागणी खासदार व अभिनेत्री हेमा मालिनी यांनी यावेळी केली.

    लोक मुंबईत येऊन कलाकारांना पाहण्यास व भेटण्यास उत्सुक असतात. कित्येकदा ते कलाकारांची भेट होत नाही म्हणून त्यांच्या बंगल्याबाहेर उभे राहून फोटो काढतात असे सांगून मुंबई येथे ५ -६ एकर जमिनीवर चित्रपट सृष्टीतील दिग्गजांचे संग्रहालय करावे व त्यांच्या योगदानाची माहिती द्यावी अशी मागणी हेमा मालिनी यांनी केली.

    देशाच्या विविध भागांमधून आलेल्या कलाकारांनी चित्रपट सृष्टीत आपले योगदान दिले असे सांगताना त्यांनी पृथ्वीराज कपूर, दिलीप कुमार, धर्मेंद्र यांच्या कार्याचे स्मरण केले. चित्रपटांच्या स्मृती जपण्यासाठी स्थिर छायाचित्रण छायाचित्रकारांची फार मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.

    नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या संचालिका निधी चौधरी यांनी यावेळी प्रास्ताविक केले. युनेस्कोने मुंबईला ‘सिटी ऑफ फिल्म्स’ हा बहुमान बहाल केल्याबद्दल प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी दोन महिन्यात गॅलरीमध्ये चित्रपट महोत्सव, चर्चासत्र आयोजित केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    यावेळी राज्यपालांनी चित्र प्रदर्शनाला भेट दिली व आपल्या आठवणींना उजाळा दिला.

    *****

    देश में पहला कैमरा त्रिपुरा के ‘माणिक्य’ घराने के पास होने की जानकारी

    राज्यपाल के हाथों फिल्म जगत के वरिष्ठ कलाकारों की फोटो प्रदर्शनी का उद्घाटन

    कोलकाता ‘सिटी ऑफ जॉय’ तो मुंबई ‘सिटी ऑफ होप’: राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    कोलकाता शहर जैसे ‘सिटी ऑफ जॉय’ के रूप में जाना जाता है, उसी प्रकार मुंबई शहर लाखों लोगों और कलाकारों को नई उम्मीद और आजीविका प्रदान करने वाला ‘सिटी ऑफ होप’ है। असंख्य लोग मुंबई में सपने लेकर आते हैं और वे सपने साकार भी होते हैं, ऐसा प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने यहां किया।

    भारतीय फिल्म उद्योग के जनक दादासाहेब फाल्के की जयंती के अवसर पर मुंबई के नेशनल गैलरी ऑफ मॉडर्न आर्ट द्वारा आयोजित फिल्म कलाकारों के छायाचित्रों तथा फिल्म पोस्टरों की प्रदर्शनी का उद्घाटन गुरुवार (दि. 30) को राज्यपाल के हाथों हुआ। इस अवसर पर वे बोल रहे थे।

    कार्यक्रम में सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार, अभिनेत्री हेमा मालिनी, विभिन्न देशों के मुंबई स्थित वाणिज्यदूत, कला प्रेमी फिरोजा गोदरेज तथा छायांकन और फिल्म उद्योग के कई गणमान्य व्यक्ति उपस्थित थे।

    भारतीय फिल्म उद्योग के प्रसिद्ध कलाकारों की मोम की प्रतिमाओं वाला भव्य संग्रहालय यदि मुंबई में बनाया जाता है, तो आम जनता उसका निश्चित रूप से स्वागत करेगी। इससे पर्यटन को भी बढ़ावा मिलेगा, ऐसा राज्यपाल ने कहा।

    भारतीय फिल्म उद्योग कला और मनोरंजन पर आधारित सबसे बड़ा उद्योग है और फिल्मों ने मानव जीवन के विभिन्न पहलुओं का सुंदर चित्रण किया है, ऐसा उन्होंने बताया।

    फिल्म क्षेत्र में कलाकारों के साथ-साथ निर्देशक, निर्माता, छायाकार, संगीतकार और तकनीशियनों का भी महत्वपूर्ण योगदान है। इस संदर्भ में उन्होंने त्रिपुरा के अपने ‘माणिक्य’ घराने से जुड़े सचिन देव बर्मन और राहुल देव बर्मन के संगीत योगदान को याद किया।

    भारत के पहले दो कैमरे त्रिपुरा के महाराजा बीर चंद्र माणिक्य और इंदौर के राजा दीन दयाल के पास थे, यह जानकारी देते हुए उन्होंने कहा कि उन्हें उसी घराने से होने पर गर्व है।

    बॉलीवुड के कारण हिंदी भाषा को बढ़ावा मिल रहा है। त्रिपुरा, नागालैंड, मेघालय सहित उत्तर-पूर्व के कई राज्यों के छोटे बच्चे बॉलीवुड के माध्यम से हिंदी बोलना सीखते हैं, ऐसा राज्यपाल ने कहा।

    बॉलीवुड देश को एक सूत्र में पिरोने वाला सांस्कृतिक धागा है और इससे एकता को बढ़ावा मिलता है, ऐसा उन्होंने कहा।

    ‘लेंस एंड लेगेसी: बॉलीवुड इन फोकस’ इस प्रदर्शनी में विभिन्न स्थिर छायाचित्रकारों द्वारा ली गई तस्वीरें प्रदर्शित की गई हैं, जिससे फिल्म उद्योग का उत्कृष्ट दस्तावेजीकरण हुआ है, ऐसा राज्यपाल ने बताया।

    मुंबई ने हिंदी फिल्मों के साथ-साथ नाटक, रंगमंच और मराठी फिल्मों को भी प्रोत्साहन दिया है, इसलिए मुंबई का महत्व कभी कम नहीं होगा, ऐसा सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार ने कहा। अपने भाषण में उन्होंने दादासाहेब फाल्के, दिवंगत अभिनेता धर्मेंद्र और पार्श्वगायिका आशा भोसले को श्रद्धांजलि अर्पित की।

    स्वप्ननगरी मुंबई एक माँ की तरह: हेमा मालिनी

    मुंबई एक स्वप्न नगरी है और यह शहर माँ की तरह हर किसी का स्वागत करता है। यह फिल्म नगरी है और यहां बड़े पैमाने पर फिल्म जगत के प्रसिद्ध कलाकारों का ‘मैडम तुसाद’ की तर्ज पर संग्रहालय बनाया जाना चाहिए, ऐसी मांग सांसद और अभिनेत्री हेमा मालिनी ने की।

    लोग मुंबई आकर कलाकारों को देखने और मिलने के लिए उत्सुक रहते हैं। कई बार वे कलाकारों से नहीं मिल पाते, तो उनके बंगलों के बाहर खड़े होकर फोटो लेते हैं। इसलिए मुंबई में 5–6 एकड़ जमीन पर फिल्म जगत के दिग्गजों का संग्रहालय बनाया जाए और उनके योगदान की जानकारी दी जाए, ऐसी मांग उन्होंने की।

    देश के विभिन्न भागों से आए कलाकारों ने फिल्म उद्योग में अपना योगदान दिया है। इस संदर्भ में उन्होंने पृथ्वीराज कपूर, दिलीप कुमार और धर्मेंद्र के कार्यों को याद किया। फिल्मों की स्मृतियों को संजोने में स्थिर छायाचित्रकारों का बहुत बड़ा योगदान है, ऐसा उन्होंने कहा।

    नेशनल गैलरी ऑफ मॉडर्न आर्ट की निदेशक निधि चौधरी ने इस अवसर पर प्रस्तावना रखी। यूनेस्को द्वारा मुंबई को ‘सिटी ऑफ फिल्म्स’ का दर्जा दिए जाने के उपलक्ष्य में इस प्रदर्शनी का आयोजन किया गया है। आगामी दो महीनों में गैलरी में फिल्म महोत्सव और चर्चाओं का आयोजन किया जाएगा, ऐसा उन्होंने बताया।

    इस अवसर पर राज्यपाल ने प्रदर्शनी का अवलोकन किया और अपनी स्मृतियों को ताजा किया।