28.04.2026 : राज्यपालांच्या हस्ते असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या वार्षिक महासभेचे व कुलगुरूंच्या राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन
28.04.2026 : असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज( एआययू )च्या १०० व्या वार्षिक महासभेचे तसेच कुलगुरूंच्या राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते आज पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ परिसर येथे संपन्न झाले. देशाला २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडविण्यासाठी नवोन्मेष व संशोधनासह सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्था निर्माण करणे आवश्यक असून या माध्यमातून विकासाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केले. उदघाटन सत्राला एआययूचे अध्यक्ष प्रा. डॉ. विनय कुमार पाठक, महासचिव डॉ. श्रीमती पंकज मित्तल, डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्रकुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, कुलगुरु डॉ. एन. जे. पवार, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे , प्र-कुलगुरु डॉ. सोमनाथ पाटील, डॉ. स्मिता जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमात “ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एज्युकेशन” स्मरणिकेचे तसेच “इंडियन युनिव्हर्सिटी जर्नल” चे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.