बंद

    23.04.2026 : कृषि आधारित इन्क्युबेशन सेंटर व स्टार्टअप्स सुरु करण्याच्या राज्यपालांच्या कृषि विद्यापीठांना सूचना

    प्रकाशित तारीख : April 24, 2026
    कृषि आधारित इन्क्युबेशन सेंटर व स्टार्टअप्स सुरु करण्याच्या राज्यपालांच्या कृषि विद्यापीठांना सूचना

    कृषि आधारित इन्क्युबेशन सेंटर व स्टार्टअप्स सुरु करण्याच्या राज्यपालांच्या कृषि विद्यापीठांना सूचना

    महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यातील कृषि व पदूम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तसेच राज्यातील कृषि तसेच पशुविज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक संपन्न झाली.

    यावेळी राज्यपालांनी प्रत्येक कृषि विद्यापीठाला कृषि आधारित इन्क्युबेशन सेंटर तसेच कृषि उत्पादनांवर आधारित ५० स्टार्टअप्स सुरु करण्याच्या सूचना केल्या. विद्यापीठात तयार होणाऱ्या कृषि आधारित उत्पादनांची विक्री व्हावी व त्यातून कृषि स्नातकांना उत्पन्नाचे साधन मिळावे या दृष्टीने स्टार्टअप्सना चालना देण्याची सूचना राज्यपालांनी केली.

    सुरुवातीला पदूम विभागाचे सचिव डॉ रामास्वामी एन. यांनी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय याबाबत सादरीकरण करुन पदूम क्षेत्रातील संधी व आव्हाने यांचे विवेचन केले. कृषी आयुक्त सुरज मांढरे, मत्स्य आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील, तसेच राज्यातील चारही कृषी विद्यापीठ व पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित होते.

    यावेळी पदूम सचिव तसेच कृषि आयुक्तांनी सादरीकरण केले. त्यानंतर नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ नितीन पाटील यांनी सादरीकरण केले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ संजय भावे यांनी यावेळी विद्यापीठाबाबत सादरीकरण केले.

    महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगरु डॉ विलास खर्चे, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे कुलगरु डॉ. शरद गडाख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगरु डॉ. इंद्र मणी यांनी देखील आपापल्या विद्यापीठांचे सादरीकरण केले.

    *****

    कृषि विश्वविद्यालय कृषि-आधारित इनक्यूबेशन सेंटर स्थापित करे: राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा की अध्यक्षता में आज राज्य के कृषि तथा पशुपालन (पदूम) विभाग के वरिष्ठ अधिकारियों और राज्य के कृषि एवं पशुविज्ञान विश्वविद्यालयों के कुलपतियों की बैठक संपन्न हुई।

    इस अवसर पर राज्यपाल ने प्रत्येक कृषि विश्वविद्यालय को कृषि-आधारित इनक्यूबेशन सेंटर स्थापित करने तथा कृषि उत्पादों पर आधारित 50 स्टार्टअप शुरू करने के निर्देश दिए। उन्होंने कहा कि विश्वविद्यालयों में विकसित कृषि उत्पादों का व्यावसायीकरण हो और उससे कृषि स्नातकों को आय के अवसर प्राप्त हों, इस उद्देश्य से स्टार्टअप्स को प्रोत्साहन दिया जाए।

    बैठक की शुरुआत में पशुपालन विभाग के सचिव डॉ. रामास्वामी एन. ने पशुपालन, डेयरी व्यवसाय और मत्स्य पालन पर प्रस्तुति देते हुए इस क्षेत्र की संभावनाओं और चुनौतियों का विस्तार से वर्णन किया। इस अवसर पर कृषि आयुक्त सुरज मांढरे, मत्स्य आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, पशुपालन आयुक्त डॉ. किरण पाटील तथा राज्य के सभी चार कृषि विश्वविद्यालयों और पशु एवं मत्स्य विज्ञान विश्वविद्यालय के कुलपति उपस्थित थे।

    बैठक के दौरान पशुपालन विभाग के सचिव और कृषि आयुक्त ने भी प्रस्तुति दी। इसके पश्चात नागपुर स्थित महाराष्ट्र पशु एवं मत्स्य विज्ञान विश्वविद्यालय के कुलपति डॉ. नितीन पाटील ने अपने विश्वविद्यालय का प्रस्तुतीकरण किया। डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ के कुलपति डॉ. संजय भावे ने भी अपने विश्वविद्यालय के बारे में जानकारी दी।

    इसके अलावा महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी के कुलपति डॉ. विलास खर्चे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला के कुलपति डॉ. शरद गडाख तथा वसंतराव नाईक मराठवाड़ा कृषि विद्यापीठ, परभणी के कुलपति डॉ. इंद्र मणि ने भी अपने-अपने विश्वविद्यालयों की प्रस्तुतियाँ दीं।

    *****

    राज्यातील सर्व कृषि विद्यापीठात ५० ॲग्री-बेस्ड इनक्यूबेशन सेंटर्स स्थापन करा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    मुंबई, दि. २३ : राज्यातील सर्व कृषि विद्यापीठात कृषि उत्पादन विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ५० ॲग्री-बेस्ड इनक्यूबेशन सेंटर्स सुरू करा.कृषि विद्यापीठात तयार होणाऱ्या कृषि उत्पादनांची विक्री व्हावी,शेतकऱ्यांना प्रशिक्षण मिळावे व कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्यांना कृषि उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी हा उपक्रम राबवावा असे निर्देश राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी दिले.

    राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली आज लोकभवन, मुंबई येथे कृषी,पशुसंवर्धन,दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विकास विभाग व कृषी विद्यापीठांच्या उपक्रमांवर उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीस पशुसंवर्धन विभागावे सचिव एन.रामस्वामी, राज्यपाल यांचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरे, कृषि आयुक्त सुरज मांढरे, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार,पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ. किरण पाटील, राज्यातील प्रमुख कृषी विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.

    राज्यपाल म्हणाले की, शेतकऱ्यांना पोस्ट-हार्वेस्ट मॅनेजमेंट बाबत योग्य मार्गदर्शन व सुविधा, शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेतकरी उत्पादक कंपनीना याबाबत मार्गदर्शन करून त्यांना सक्षम करण्यावर भर दिला पाहिजे.कृषी विद्यापीठांनी शैक्षणिक व प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ करून राष्ट्रीय स्तरावरील यूजीसी क्रमवारीत प्रगती साधावी. संशोधन, शैक्षणिक गुणवत्ता व संस्थात्मक प्रशासन सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा सर्वांपर्यंत पोहोचवा.शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रभावीपणे काम करावे असे निर्देशही त्यांनी दिले.

    राज्यपाल म्हणाले की, नंदूरबार येथे आदिवासी महाविद्यालयात कृषि विभागाच्या वतीने कौशल्य प्रशिक्षण राबविण्यात यावे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय क्षेत्रात शाश्वतता, नवोन्मेष आणि शेतकरी-केंद्रित उपाययोजना राबविण्यासाठी विद्यापीठे, संशोधन संस्था आणि शासनाचे विविध विभाग यांच्यात समन्वय वाढवावा.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाच्या योजना प्रभावीपणे समन्वयातून सर्वांनी काम करावे.शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी व शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊन त्यांचा उदरनिर्वाह अधिक सक्षम होईल असे उपक्रम राबविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

    लोकभवनचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरे यांनी प्रास्ताविक केले. पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय विभागावे सचिव एन.रामस्वामी यांनी विभागाचे सादरीकरण केले.विकसित महाराष्ट्र २०४७ च्या अनुषंगाने कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.विविध नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्यात येत आहे.मत्स्यव्यवसायिकांना शासकीय योजनांची माहिती होण्यासाठी विविध योजना पुस्तिका तयार करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर या योजनांची प्रसिध्दी होण्यासाठी मोबाईल ग्रुप,चॅट बोट, सुरू आहेत. या क्षेत्रात रोजगार वाढीसाठी योजनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. विकसित २०४७ च्या मिशन डाक्युमेंटप्रमाणे विभागाचे कामकाज सुरु आहे असे त्यांनी सांगितले.

    कृषि आयुक्त सुरज मांढरे यांनी कृषि विभागाचे सादरीकरण केले.महाविस्तार ॲप ४० लाख लोकांनी हे ॲप हे डॉउनलोड केले आहे. महाॲग्री एआय धोरण,अॅग्रीस्टॅक मध्ये देशात व्दितीय क्रमांकावर आहोत.१.३२ कोटी लोकांनी ॲग्रीस्टॅक काढलेले आहेत.आदिवासी विकास विभागासाठी योजना, नैसर्गिक शेती शाळा, मॅग्नेट हा प्रोजेक्ट,एल निनोचा यावर्षी शेतीवर होणारा परिणाम,प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रकिया योजना, कृषि विभागातील आकृतीबंद आणि त्यात केलेले बदल, आगामी तीस वर्षात कृषि क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, शाश्वत विकास होणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना याची माहिती दिली.

    यावेळी महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन पाटील यांनी सादरीकरण केले.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली विद्यापीठाचे कुलगरु डॉ संजय भावे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी विद्यापीठाचे कुलगरु डॉ विलास खर्चे, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला विद्यापीठाचे कुलगरु डॉ. शरद गडाख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी विद्यापीठाचे कुलगरु डॉ. इंद्रमणी या कुलगुरुंनी विद्यापीठांची सविस्तर माहिती व विद्यापीठात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती राज्यपालांना सादर केली.

    DGIPR, मंत्रालय