14.04.2026 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे महामानवाला अभिवादन
14 04 2026 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबईतील चैत्यभूमी येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला व अभिवादन केले. यावेळी त्रिशरण बुद्ध वंदनेचे पठण करण्यात आले. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित केलेल्या डॉ. आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाला भेट दिली आणि भीमज्योतीवर पुष्पांजली अर्पण केली. राज्यपालांनी यावेळी बौद्ध भिक्षूंना पवित्र चिवर प्रदान केले. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, प्रकाश आंबेडकर, महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे, मुंबईच्या महापौर ऋतु तावडे, मंत्री छगन भुजबळ, मंगल प्रभात लोढा, आशीष शेलार व संजय शिरसाट, माजी खासदार राहुल शेवाळे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, भदंत डॉ. राहुल बोधी महाथेरो, नागसेन कांबळे तसेच अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.