बंद

    07.04.2026 : राज्यपालांच्या उपस्थितीत फिक्कीचा ९९ वा स्थापना दिन साजरा

    प्रकाशित तारीख : April 7, 2026
    07.04.2026 : फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) या संस्थेचा ९९ वा स्थापना दिवस राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे संपन्न झाला. 
यावेळी राज्यपालांच्या हस्ते फिक्कीच्या भूतपूर्व अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. महात्मा गांधी यांच्या सूचनेवरून फिक्की संस्थेची सुरुवात मुंबई येथे झाली. पुढील वर्षी फिक्की शताब्दी वर्ष साजरे करीत आहे. कार्यक्रमाला राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, फिक्कीचे अध्यक्ष अनंत गोयंका, फिक्कीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजय शंकर, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती, संस्थेच्या महासंचालक ज्योती वीज उपस्थित होते.

    राज्यपालांच्या उपस्थितीत फिक्कीचा ९९ वा स्थापना दिन साजरा

    मध्य पूर्वेतील युद्धाचे अर्थव्यवस्थेवरील होणाऱ्या परिणामाचे अध्ययन करण्याची राज्यपालांची सूचना

    मध्य पूर्वेतील युद्धामुळे जगातील प्रत्येक व्यक्तीचे जीवन बाधित झाले आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर युद्धामुळे विपरीत परिणाम होत आहे. आपल्या शताब्दी वर्षात पदार्पण करीत असलेल्या फिक्की संस्थेने या युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर विशेषतः सेवा तसेच सूक्ष्म, लघु व माध्यम उद्योगांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांचे मूल्यांकन करावे व नुकसान कमी करण्याच्या दृष्टीने शिफारसी कराव्या असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज येथे केले.

    फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) या संस्थेचा ९९ वा स्थापना दिवस राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

    युद्धामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावर देखील विपरीत परिणाम होत आहे. काही कंपन्यांनी मोठी कर्मचारी कपात केली आहे. युद्धाची झळ जनसामान्यांना बसू नये याकरिता शासन आपल्या स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. ‘फिक्की’ने देखील लोकांच्या कौशल्य वर्धनासंबंधी शिफारशी कराव्या असे राज्यपालांनी सांगितले. फिक्कीने राज्यातील विद्यापीठांसोबत काम करावे तसेच स्नातकांसाठी प्रशिक्षणाच्या संधी निर्माण कराव्या असे आवाहन देखील राज्यपालांनी यावेळी केले.

    भारत ही सर्वात जलद गतीने वाढत असलेली अर्थव्यवस्था असून राज्याचे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये योगदान सर्वाधिक असून राज्य थेट परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत सर्वात आघाडीवर आहे. राजशिष्टाचार विभागाने थेट परकीय गुंतवणूक वाढवण्यासाठी व देश विदेशातील महाराष्ट्राच्या लोकांना राज्याच्या अर्थव्यवस्थेशी जोडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

    महात्मा गांधी यांच्या सूचनेवरून फिक्की संस्थेची सुरुवात मुंबई येथे झाली. पुढील वर्षी फिक्की शताब्दी वर्ष साजरे करीत आहे, असे फिक्कीचे अध्यक्ष अनंत गोयंका यांनी यावेळी सांगितले. .

    यावेळी राज्यपालांच्या हस्ते फिक्कीचे गेल्या तीस वर्षांमधील माजी अध्यक्ष राजीव भारती मित्तल, हर्ष पती सिंघानिया, राजीव चंद्रशेखर, हाबिलं खोराकीवाला, हर्ष मरीवाला, सरोज कुमार पोद्दार, ओंकार कंवल, डॉ ए सी मुथैय्या, राजेंद्र लोढा, चिरायू अमीन, सुधीर जालान, के के मोदी, ए एस कासलीवाल, दीपक बँकर, ए के रुंगटा आदींचा त्यांच्या उद्योग जगातला दिलेल्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.

    कार्यक्रमाला फिक्कीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजय शंकर, संस्थेच्या महासंचालक ज्योती वीज, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती आदी उपस्थित होते.

    **

    राज्यपाल की उपस्थिति में फिक्की का 99वां स्थापना दिवस मनाया गया

    मध्य पूर्व युद्ध के आर्थिक प्रभावों का अध्ययन करने का राज्यपाल का सुझाव

    मध्य पूर्व में चल रहे युद्ध के कारण विश्व के प्रत्येक व्यक्ति का जीवन प्रभावित हुआ है और अनेक देशों की अर्थव्यवस्थाओं पर इसका प्रतिकूल असर पड़ रहा है। ऐसे में अपने शताब्दी वर्ष में प्रवेश करने जा रही फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) को इस युद्ध के भारतीय अर्थव्यवस्था, विशेषकर सेवा क्षेत्र तथा सूक्ष्म, लघु एवं मध्यम उद्योगों पर संभावित प्रभावों का आकलन करना चाहिए तथा नुकसान को कम करने के लिए ठोस सुझाव देने चाहिए, ऐसा आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने आज यहां किया।

    मुंबई में आयोजित फिक्की के 99वें स्थापना दिवस समारोह में मुख्य अतिथि के रूप में संबोधित करते हुए राज्यपाल ने यह बात कही।

    राज्यपाल ने कहा कि इस युद्ध का नकारात्मक प्रभाव सूचना प्रौद्योगिकी क्षेत्र पर भी पड़ रहा है और कुछ कंपनियों ने बड़े पैमाने पर कर्मचारियों की छंटनी की है। आम जनता पर इसका दुष्प्रभाव न पड़े, इसके लिए सरकार हर संभव प्रयास कर रही है। उन्होंने फिक्की से लोगों के कौशल विकास के लिए भी सुझाव देने का आग्रह किया। साथ ही, फिक्की को राज्य के विश्वविद्यालयों के साथ मिलकर काम करने और स्नातकों के लिए प्रशिक्षण के अवसर सृजित करने की आवश्यकता पर भी बल दिया।

    उन्होंने कहा कि भारत विश्व की सबसे तेज़ी से बढ़ती अर्थव्यवस्थाओं में से एक है तथा महाराष्ट्र का देश की अर्थव्यवस्था में सर्वाधिक योगदान है। प्रत्यक्ष विदेशी निवेश के मामले में भी राज्य अग्रणी है। राज्यपाल ने बताया कि राजशिष्टाचार विभाग प्रत्यक्ष विदेशी निवेश को बढ़ाने तथा देश-विदेश में बसे महाराष्ट्र के लोगों को राज्य की अर्थव्यवस्था से जोड़ने के लिए सक्रिय रूप से कार्य कर रहा है।

    इस अवसर पर फिक्की के अध्यक्ष अनंत गोयंका ने बताया कि महात्मा गांधी के सुझाव पर फिक्की की स्थापना मुंबई में हुई थी और संस्था अगले वर्ष अपना शताब्दी वर्ष मनाएगी।

    कार्यक्रम के दौरान राज्यपाल के हाथों फिक्की के पिछले तीन दशकों के पूर्व अध्यक्षों— राजीव भारती मित्तल, हर्ष पती सिंघानिया, राजीव चंद्रशेखर, हाबिलं खोराकीवाला, हर्ष मरीवाला, सरोज कुमार पोद्दार, ओंकार कंवल, डॉ ए सी मुथैय्या, राजेंद्र लोढा, चिरायू अमीन, सुधीर जालान, के के मोदी, ए एस कासलीवाल, दीपक बँकर, ए के रुंगटा —को उद्योग जगत में उनके योगदान के लिए सम्मानित किया गया।

    इस अवसर पर फिक्की के वरिष्ठ उपाध्यक्ष विजय शंकर, महासंचालक ज्योती वीज, राज्यपाल के सचिव डॉ. प्रशांत नारनवरे तथा सह सचिव एस. राममूर्ति सहित अन्य गणमान्य व्यक्ति उपस्थित थे।