बंद

    27.03.2026: राज्यपालांच्या उपस्थितीत शिक्षक क्षमता संवर्धन परिषदेचे उद्घाटन

    प्रकाशित तारीख : March 27, 2026
    Governor inaugurates National Conclave on Capacity Building of Teachers

    राज्यपालांच्या उपस्थितीत शिक्षक क्षमता संवर्धन परिषदेचे उद्घाटन

    महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी आज सात राज्यांमधील शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील भागधारकांच्या क्षमता वृद्धीसाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदचे दृकश्राव्य माध्यमातून उद्घाटन केले. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाने (एस.एन.डी.टी.), राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांच्या सहकार्याने या दोन दिवसीय परिषदेचे पुणे येथे आयोजन केले आहे.

    उदघाटन सत्राला एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. उज्वला चक्रदेव, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, एनसीटीईचे कार्यक्रम समन्वयक डी. के. चतुर्वेदी, उच्च शिक्षण संचालक शैलेन्द्र देवळाणकर, केंद्रीय विद्यालय संघटनेचे आयुक्त विकास गुप्ता, तसेच एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. विलास नांदवडेकर आदी उपस्थित होते.

    यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान तसेच एनसीटीईचे अध्यक्ष प्रा. पंकज अरोरा यांचे व्हिडीओ संदेश दाखवण्यात आले.