20.03.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे नागपुरात आगमन व स्वागत
20.03.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे डॅा. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. विमानतळावर आगमनप्रसंगी विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, नागपूर शहर सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त आयुक्त डॉ . शिवाजी राठोड, पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महीरे यांनी त्यांचे स्वागत केले. दि. २१ मार्च रोजी उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांच्यासमवेत रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात आयोजित ‘भारतीय युवा संसद’ च्या २९ व्या उद्घाटन सत्राला ते उपस्थित राहणार आहेत. राज्यपालपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच नागपूर दौरा आहे.