18.03.2026: गिरीप्रेमी युवकांच्या माऊंट एव्हरेस्ट मोहिमेला राज्यपालांच्या शुभेच्छा
18.03.2026: अर्जुन पुरस्कार व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली येत्या २ एप्रिल पासून माऊंट एव्हरेस्टवर जाणाऱ्या गिर्यारोहकांच्या चमूला आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महाराष्ट्र लोकभवन येथून झेंडी दाखवून रवाना केले. 'गिरीप्रेमी'चे संस्थापक उमेश झिरपे यांचेसह गिर्यारोहक विवेक शिवदे, निकुंज शहा, मिहीर जाधव व अखिल कारकर यंदाच्या माऊंट एव्हरेस्ट मोहिमेत सहभागी होत आहेत.
18.03.2026: The Governor of Maharashtra Jishnu Dev Varma, today flagged off a team of mountaineers embarking on a Mount Everest expedition starting 2 April, at Maharashtra Lok Bhavan. The expedition is being led by Arjuna Award and Shiv Chhatrapati State Sports Award-winning mountaineer Umesh Zirpe. Founder of Giripremi, Umesh Zirpe, along with mountaineers Vivek Shivde, Nikunj Shah, Mihir Jadhav, and Akhil Karkar, are participating in this year’s Mount Everest expedition.