भाषण – 15.03.2026:राज्यपालांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहामध्ये मानद डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान
15.03.2026: राज्यपाल तथा राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ३९ व्या दीक्षांत समारोहामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स (डी.एससी.) ही पदवी प्रदान करण्यात आली. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ३९ व्या दीक्षांत समारोहामध्ये मुख्यमंत्र्यांना कृषी क्षेत्रामधे डिजिटल तंत्रज्ञानाला चालना दिल्याबद्दल ही मानद पदवी देण्यात आली. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ४१८२ स्नातकांना पदवी, ३४६ स्नातकांना पदव्युत्तर पदवी, ७४ स्नातकांना डॉक्टरेट व ३९ स्नातकांना पदके प्रदान करण्यात आली. दीक्षांत समारोहाला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, राज्याचे कृषि मंत्री तथा महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्र-कुलपती दत्तात्रय भरणे, राज्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ अशोक कुमार सिंह, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ विलास खर्चे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.