12.03.2026: महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या मुख्य आयुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट
12.03.2026: महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव यांनी आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्य आयुक्तांनी राज्यपालांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या प्रभावी अंमलबजावणीबाबत माहिती दिली. सदर अधिनियमाबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या सहकार्याने उपक्रम हाती घेण्यात यावेत तसेच त्या दृष्टीने कुलगुरुंची बैठक बोलावण्यात यावी अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.
12.03.2026: Chief Commissioner of the Maharashtra Right to Public Services Commission Manu Kumar Srivastava called on the Governor of Maharashtra Jishnu Dev Varma at Lok Bhavan Mumbai. The Chief Commissioner apprised the Governor about the efforts for the effective implementation of the Maharashtra Right to Public Services Act, 2015.