बंद

    01.03.2026: डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे महाराष्ट्र लोकभवन येथे स्वच्छता अभियान

    प्रकाशित तारीख : March 1, 2026
    01.03.2026: ज्येष्ठ निरुपणकार डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर घेण्यात आलेल्या स्वच्छता अभियाना अंतर्गत महाराष्ट्राच्या राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या महाराष्ट्र लोकभवन येथे श्री सदस्यांतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. राज्यपालांचे सहसचिव एस राममूर्ती, भाप्रसे यांच्या हस्ते लोकभवन प्रवेश द्वाराजवळ अभियानाचे उदघाटन झाले. स्वच्छता अभियानात जवळपास दोनशे श्री सदस्यांनी भाग घेतला व लोकभवनातील समुद्र किनारा व इतर परिसरातून ४१६ किलो प्लास्टिक - थर्माकोल कचरा गोळा केला.

    डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे महाराष्ट्र लोकभवन येथे स्वच्छता अभियान

    ज्येष्ठ निरुपणकार डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर घेण्यात आलेल्या स्वच्छता अभियाना अंतर्गत महाराष्ट्राच्या राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या महाराष्ट्र लोकभवन येथे श्री सदस्यांतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

    राज्यपालांचे सहसचिव एस राममूर्ती, भाप्रसे यांच्या हस्ते लोकभवन प्रवेश द्वाराजवळ अभियानाचे उदघाटन झाले.

    डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या १४ वर्षांपासून लोकभवन येथे स्वच्छता व वृक्षारोपण तसेच वृक्ष संवर्धनाचे कार्य केले जात असल्याबद्दल राममूर्ती यांनी प्रतिष्ठानच्या सदस्यांचे कौतुक केले तसेच भविष्यात देखील स्वच्छता व पर्यावरण रक्षणाचे कार्य सुरु ठेवण्याचा संदेश दिला. जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

    आजच्या स्वच्छता अभियानात जवळपास दोनशे श्री सदस्यांनी भाग घेतला व लोकभवनातील समुद्र किनारा व इतर परिसरातून ४१६ किलो प्लास्टिक – थर्माकोल कचरा गोळा केला.

    **

    डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान द्वारा महाराष्ट्र लोकभवन में स्वच्छता अभियान

    वरिष्ठ निरूपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी की जयंती के अवसर पर राज्यभर आयोजित स्वच्छता अभियान के अंतर्गत महाराष्ट्र के राज्यपाल के निवास स्थान महाराष्ट्र लोकभवन में श्री सदस्यों द्वारा स्वच्छता अभियान चलाया गया।

    राज्यपाल के सहसचिव श्री एस. राममूर्ति, भाप्रसे, के हाथों लोकभवन के प्रवेश द्वार के निकट अभियान का उद्घाटन किया गया।

    डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान की ओर से पिछले 14 वर्षों से लोकभवन परिसर में स्वच्छता, वृक्षारोपण तथा वृक्ष संरक्षण का कार्य किया जा रहा है। इस सराहनीय पहल के लिए श्री राममूर्ति ने प्रतिष्ठान के सदस्यों की प्रशंसा की तथा भविष्य में भी स्वच्छता एवं पर्यावरण संरक्षण के कार्य को निरंतर जारी रखने का संदेश दिया।

    जनसंपर्क अधिकारी श्री उमेश काशीकर ने स्वागत एवं प्रस्तावना प्रस्तुत की।

    आज के स्वच्छता अभियान में लगभग दो सौ श्री सदस्यों ने भाग लिया तथा लोकभवन के समुद्र तट और अन्य क्षेत्रों से 416 किलोग्राम प्लास्टिक एवं थर्माकोल कचरा एकत्रित किया।