25.02.2026: राष्ट्रपतींच्या हस्ते ‘एकता व विश्वासाच्या माध्यमातून स्वर्णिम महाराष्ट्राची निर्मिती’ या विषयावरील अभियानाचा शुभारंभ
25.02.2026: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ब्रह्मकुमारींच्या ‘एकता व विश्वासाच्या माध्यमातून स्वर्णिम महाराष्ट्राची निर्मिती’ या विषयावरील राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ विश्वशांती सरोवर नागपूर येथे करण्यात आला. कार्यक्रमाला राज्यपाल आचार्य देवव्रत, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ब्रह्मकुमारीचे अपर महासचिव राजयोगी बी के मृत्युंजय, ब्रह्मकुमारीच्या युवा विभागाच्या प्रमुख राजयोगिनी बी के चंद्रिका, ब्रह्मकुमारी नागपूर उपकेंद्राच्या प्रभारी राजयोगिनी बी के रजनी आदी यावेळी उपस्थित होते.