बंद

    17.02.2026: भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा

    प्रकाशित तारीख : February 18, 2026
    17.02.2026:  फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष  इमॅन्युएल मॅक्रॉन आणि भारताचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र लोक भवन, मुंबई येथे माध्यमांशी संवाद झाला. या प्रसंगी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार श्री. अजित डोवाल तसेच फ्रान्सचे अर्थ, वित्त, औद्योगिक, ऊर्जा व डिजिटल सार्वभौमत्व मंत्री श्री. रोलँड लेस्क्युर उपस्थित होते.

    वृत्त 456
    भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा
    – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा

    मुंबई, दि. 17 : बदलत्या जागतिक परिस्थितीत भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांनी जागतिक स्थैर्य, समृद्धी आणि नियमाधिष्ठीत व्यवस्थेला बळकटी देण्याचा संकल्प करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा नवा दर्जा देण्यात येत असल्याची घोषणा केली.

    फ्रान्स प्रजासत्ताकचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या मुंबई भेटीदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मॅक्रॉन यांच्यात लोकभवन येथे बैठक झाली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना दोन्ही नेत्यांनी या द्विपक्षीय सहकार्याला नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी त्यांच्या हस्ते भारतामध्ये एअरबस एच125 हेलिकॉप्टरसाठी टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्सच्या असेंब्ली लाईनचे दूरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. यावेळी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर यांच्यासह दोन्ही देशांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत आणि फ्रान्सचे संबंध विश्वासावर आधारित आहेत. फ्रान्स हा भारताच्या सर्वात जुन्या धोरणात्मक भागीदारांपैकी एक असून राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या नेतृत्वाखाली या भागीदारीला अभूतपूर्व गती आणि ऊर्जा मिळाली आहे. आजच्या अस्थिर जागतिक परिस्थितीत ही भागीदारी केवळ धोरणात्मक नसून जागतिक स्थैर्य आणि प्रगतीसाठीची भागीदारी ठरेल, असे त्यांनी यावेळी नमूद केले.

    हेलिकॉप्टर असेंब्ली लाईनचे उद्घाटन हे परस्पर विश्वासाचे प्रतीक असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितले. फ्रान्सच्या सहकाऱ्याने माउंट एव्हरेस्टच्या उंचीपर्यंत उड्डाण करू शकणारे एकमेव हेलिकॉप्टर भारतात तयार होणार असून ते जागतिक बाजारपेठेत निर्यातही केले जाणार आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या भागीदारीमध्ये खोल समुद्रापासून पासून उंच पर्वतापर्यंत पोहोचण्याची क्षमता असल्याचे ते म्हणाले.

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2026 हे वर्ष भारत-युरोप संबंधांसाठी निर्णायक ठरणार असल्याचे सांगितले. अलीकडेच यूरोपियन यूनियनसोबत झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे भारत-फ्रान्स व्यापार संबंधांनाही मोठी चालना मिळणार आहे. ‘इंडिया फ्रान्स इयर्स ऑफ इनोव्हेशन’ उपक्रमांतर्गत संरक्षण, स्वच्छ ऊर्जा, अवकाश आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात उद्योग, स्टार्टअप्स, एमएसएमई, विद्यार्थी आणि संशोधक यांच्यासाठी संयुक्त इनोव्हेशन सेंटर्स स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले. क्रिटिकल मिनरल्स, बायोटेक्नॉलॉजी आणि अ‍ॅडव्हान्स मटेरियल्समध्ये सहकार्य वाढवले जाणार असून ‘इंडो-फ्रेंच सेंटर फॉर एआय इन हेल्थ’, ‘इंडो-फ्रेंच सेंटर फॉर डिजिटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ आणि एरोनॉटिक्स कौशल्य विकासासाठी राष्ट्रीय केंद्राची स्थापना करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, भारत आणि फ्रान्स दोन्ही देश लोकशाही मूल्ये, कायद्याचे राज्य आणि बहुपक्षीय व्यवस्थेवर विश्वास ठेवतात. जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करूनच जागतिक आव्हानांवर मात करता येईल, अशी दोन्ही देशांची भूमिका असल्याचे सांगून युक्रेन, पश्चिम आशिया किंवा इंडो-पॅसिफिक परिसरात शांततेसाठी सर्व प्रयत्नांना समर्थन देण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. सर्व प्रकारचा दहशतवाद संपविण्याचीही दोन्ही देशांची सामायिक बांधिलकी असल्याचे त्यांनी सांगितले. भारत आणि फ्रान्स दरम्यान सांस्कृतिक देवाणघेवाण अधिक दृढ करण्यावर भर दिल्याचे सांगून फ्रान्समध्ये लवकरच ‘स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र’ सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

    दोन्ही देश मिळून जागतिक स्थैर्य आणि समृद्धीसाठी कार्य करूया, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मॅक्रॉन यांना केले.


    फ्रान्स आणि भारताची भागीदारी परस्पर विश्वास, खुलेपणाच्या आधारावर
    – फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन

    भारत–फ्रान्स सहकार्य अधिक दृढ होत असून परस्पर विश्वास, खुलेपणा आणि महत्त्वाकांक्षा या आधारावर ही भागीदारी पुढे जात असल्याचे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सांगितले.

    दोन्ही देशांनी या संबंधांना पुढील टप्प्यावर नेण्यासाठी विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी स्वीकारली आहे. तसेच तंत्रज्ञान, संरक्षण व व्यापार सहकार्य यातही समान भूमिका स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले.

    आंतरराष्ट्रीय पातळीवर मुक्त व्यापाराला पाठिंबा देत भारत–यूरोपियन यूनियन मुक्त व्यापार कराराला फ्रान्सचा ठाम पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. दहशतवादाविरोधात संयुक्त प्रयत्न आणि दहशतवादी संघटनांचा निषेध करण्यावर फ्रान्स आणि भारताची समान भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

    भारत–फ्रान्स भागीदारी ही स्थिर, विश्वासार्ह आणि दोन्ही देशांच्या जनतेच्या हितासाठी परिणामकारक ठरत असून भविष्यात ती अधिक प्रभावी करण्याचा दोन्ही देशांचा निर्धार आहे. लवकरच फ्रान्स–भारत नवोपक्रम नेटवर्क, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि आरोग्य क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी संयुक्त केंद्र स्थापन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    00000

    ब्रिजकिशोर झंवर/संजय ओरके

    भारत–फ्रांस संबंधों को ‘विशेष वैश्विक रणनीतिक साझेदारी’ का दर्जा
    – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की घोषणा

    मुंबई, 17 फरवरी: बदलती वैश्विक परिस्थितियों के बीच वैश्विक स्थिरता, समृद्धि और नियम-आधारित अंतरराष्ट्रीय व्यवस्था को सुदृढ़ करने के संकल्प के साथ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने भारत–फ्रांस संबंधों को ‘विशेष वैश्विक रणनीतिक साझेदारी’ का नया दर्जा देने की घोषणा की।

    फ्रांसीसी गणराज्य के राष्ट्रपति इमॅन्युएल मॅक्रॉन की मुंबई यात्रा के दौरान लोक भवन में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और राष्ट्रपति मैक्रों के बीच द्विपक्षीय बैठक हुई। बैठक के बाद मीडिया को संबोधित करते हुए दोनों नेताओं ने इस सहयोग को नई ऊंचाइयों तक ले जाने का संकल्प व्यक्त किया। इस अवसर पर भारत में एयरबस एच-125 हेलिकॉप्टर के लिए टाटा एडवांस्ड सिस्टम्स की असेंबली लाइन का दूरस्थ माध्यम से उद्घाटन किया गया। इस कार्यक्रम में विदेश मंत्री डॉ. एस. जयशंकर सहित दोनों देशों के प्रतिनिधिमंडल उपस्थित थे।

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा कि भारत और फ्रांस के संबंध परस्पर विश्वास पर आधारित हैं। फ्रांस भारत के सबसे पुराने रणनीतिक साझेदारों में से एक है और राष्ट्रपति मैक्रों के नेतृत्व में इस साझेदारी को अभूतपूर्व गति और नई ऊर्जा मिली है। वर्तमान अस्थिर वैश्विक परिस्थितियों में यह साझेदारी केवल रणनीतिक ही नहीं, बल्कि वैश्विक स्थिरता और प्रगति के लिए भी महत्वपूर्ण है।

    उन्होंने कहा कि हेलिकॉप्टर असेंबली लाइन का उद्घाटन परस्पर विश्वास का प्रतीक है। फ्रांस के सहयोग से ऐसा हेलिकॉप्टर भारत में निर्मित होगा जो माउंट एवरेस्ट की ऊंचाई तक उड़ान भरने में सक्षम है और इसे वैश्विक बाजारों में निर्यात भी किया जाएगा। इससे स्पष्ट होता है कि दोनों देशों की साझेदारी समुद्र की गहराइयों से लेकर ऊंचे पर्वतों तक पहुंचने की क्षमता रखती है।
    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा कि वर्ष 2026 भारत–यूरोप संबंधों के लिए निर्णायक सिद्ध होगा। हाल ही में यूरोपीय संघ के साथ संपन्न मुक्त व्यापार समझौते से भारत–फ्रांस व्यापार संबंधों को भी महत्वपूर्ण बढ़ावा मिलेगा। ‘इंडिया–फ्रांस इयर्स ऑफ इनोवेशन’ पहल के अंतर्गत रक्षा, स्वच्छ ऊर्जा, अंतरिक्ष और उभरती प्रौद्योगिकी के क्षेत्रों में उद्योगों, स्टार्टअप्स, एमएसएमई, विद्यार्थियों और शोधकर्ताओं के लिए संयुक्त नवाचार केंद्र स्थापित किए जाएंगे।

    इसके साथ ही महत्वपूर्ण खनिज, जैव प्रौद्योगिकी और उन्नत सामग्री के क्षेत्रों में सहयोग बढ़ाया जाएगा। ‘इंडो–फ्रेंच सेंटर फॉर एआई इन हेल्थ’, ‘इंडो–फ्रेंच सेंटर फॉर डिजिटल साइंस एंड टेक्नोलॉजी’ तथा एयरोनॉटिक्स कौशल विकास के लिए एक राष्ट्रीय केंद्र की स्थापना भी की जाएगी।

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा कि भारत और फ्रांस दोनों लोकतांत्रिक मूल्यों, विधि के शासन और बहुपक्षीय व्यवस्था में विश्वास रखते हैं। वैश्विक संस्थाओं में सुधार के माध्यम से ही वैश्विक चुनौतियों का सामना किया जा सकता है। उन्होंने यूक्रेन, पश्चिम एशिया और इंडो-पैसिफिक क्षेत्र में शांति के लिए सभी प्रयासों का समर्थन करने की बात कही। दोनों देशों की सभी प्रकार के आतंकवाद को समाप्त करने की साझा प्रतिबद्धता भी है।

    सांस्कृतिक आदान-प्रदान को और सुदृढ़ करने पर बल देते हुए उन्होंने घोषणा की कि फ्रांस में शीघ्र ही ‘स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र’ की स्थापना की जाएगी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने राष्ट्रपति मैक्रों से वैश्विक स्थिरता और समृद्धि के लिए मिलकर कार्य करने का आह्वान किया।

    परस्पर विश्वास और खुलेपन पर आधारित है फ्रांस–भारत साझेदारी
    – इमॅन्युएल मॅक्रॉन

    राष्ट्रपति इमॅन्युएल मॅक्रॉन ने कहा कि भारत–फ्रांस सहयोग निरंतर सुदृढ़ हो रहा है और यह परस्पर विश्वास, खुलेपन तथा साझा महत्वाकांक्षाओं पर आधारित है। दोनों देशों ने संबंधों को अगले स्तर पर ले जाने के लिए ‘विशेष वैश्विक रणनीतिक साझेदारी’ को अपनाया है।

    उन्होंने बताया कि प्रौद्योगिकी, रक्षा और व्यापार सहयोग के क्षेत्रों में भी दोनों देशों की समान दृष्टि है। अंतरराष्ट्रीय स्तर पर मुक्त व्यापार के समर्थन में फ्रांस दृढ़ है तथा भारत–यूरोपीय संघ मुक्त व्यापार समझौते को उसका पूर्ण समर्थन है। आतंकवाद के विरुद्ध संयुक्त प्रयासों और आतंकवादी संगठनों की निंदा के विषय में भी दोनों देशों का दृष्टिकोण समान है।

    उन्होंने कहा कि भारत–फ्रांस साझेदारी स्थिर, विश्वसनीय और दोनों देशों की जनता के हित में प्रभावी सिद्ध हो रही है तथा भविष्य में इसे और अधिक सशक्त बनाने का दोनों देशों का संकल्प है। शीघ्र ही फ्रांस–भारत नवाचार नेटवर्क, डिजिटल प्लेटफॉर्म तथा स्वास्थ्य क्षेत्र में कृत्रिम बुद्धिमत्ता के लिए संयुक्त केंद्र की स्थापना की जाएगी।

    00000