16.02.2026: इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे मुंबईत सपत्नीक आगमन; राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे मुंबईत सपत्नीक आगमन; राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होणाऱ्या महत्वपूर्ण बैठकीसाठी आज मुंबई येथे आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल आचार्य देवव्रत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मॅक्रॉन तसेच त्यांच्या पत्नी ब्रिगिट यांचे स्वागत केले.
मंगळवारी (दि. १७) पंतप्रधान नरेंद्र मोदी व अध्यक्ष मॅक्रॉन यांची महाराष्ट्र लोकभवन येथे महत्वपूर्ण बैठक होत आहे.
संध्याकाळी पंतप्रधान मोदी व मॅक्रॉन हे गेटवे ऑफ इंडिया येथे होत असलेल्या ‘इंडिया – फ्रांस यिअर ऑफ इनोव्हेशन अँड कल्चरल कमेमोरेशन’ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
मॅक्रॉन यांच्या मुंबई आगमन प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल व वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.
*****
इमैनुएल मैक्रॉन का मुंबई में पत्नी सहित आगमन; राज्यपाल और मुख्यमंत्री द्वारा स्वागत
फ्रांस के राष्ट्रपति इमैनुएल मैक्रॉन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के साथ होने वाली महत्वपूर्ण बैठक के लिए मुंबई पहुंचे। छत्रपति शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय हवाई अड्डे पर राज्यपाल आचार्य देवव्रत और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने मैक्रॉन तथा उनकी पत्नी ब्रिजिट का स्वागत किया।
मंगलवार (दि. 17) को प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और राष्ट्रपति मैक्रॉन के बीच महाराष्ट्र लोकभवन में महत्वपूर्ण बैठक आयोजित की जा रही है।
शाम को प्रधानमंत्री मोदी और मैक्रॉन गेटवे ऑफ इंडिया में आयोजित ‘इंडिया-फ्रांस ईयर ऑफ इनोवेशन एंड कल्चरल कमेमोरेशन’ कार्यक्रम में भाग लेंगे।
मैक्रॉन के मुंबई आगमन के अवसर पर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल तथा वरिष्ठ अधिकारी भी उपस्थित थे।