15.02.2026: संत सेवालाल महाराज यांना लोकभवन येथे अभिवादन
संत सेवालाल महाराज यांना लोकभवन येथे अभिवादन
संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज (दि. १५ ) महाराष्ट्र लोकभवन येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.
राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती व परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे यांनी सर्वप्रथम संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
त्यानंतर लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच लोकभवन येथे कर्तव्यावर असलेल्या पोलीसांनी संत सेवालाल महाराज यांना अभिवादन केले.