बंद

    31.01.2026: प्रा. संजीव सोनावणे यांना आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु पदाचा अतिरिक्त कार्यभार

    प्रकाशित तारीख : January 31, 2026

    प्रा. संजीव सोनावणे यांना आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु पदाचा अतिरिक्त कार्यभार

    महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती आचार्य देवव्रत यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. संजीव सोनावणे यांना महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे.

    दिनांक २३ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यपालांनी डॉ अजय चंदनवाले, संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांना आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला होता. परंतु डॉ चंदनवाले दिनांक ३१ जानेवारी रोजी संचालक पदावरुन सेवानिवृत्त होत असल्यामुळे, राज्यपालांनी प्रा. सोनावणे यांना दिनांक १ फेब्रुवारी पासून पुढील आदेशांपर्यंत आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्याचे सूचित केले आहे.