30.01.2026: लोकभवन येथे हुतात्म्यांना आदरांजली
लोकभवन येथे हुतात्म्यांना आदरांजली
महात्मा गांधी स्मृती दिन तसेच हुतात्मा दिनानिमित्त महाराष्ट्र लोकभवन मुंबई येथे दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.
राज्यपालांचे सहसचिव एस राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे यांसह लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी यावेळी दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांचे स्मरण केले.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ३० जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो.